दापोली अर्बन महाविद्यालयात शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दापोली अर्बन महाविद्यालयात शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा
दापोली अर्बन महाविद्यालयात शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा

दापोली अर्बन महाविद्यालयात शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा

sakal_logo
By

दापोली अर्बन महाविद्यालयात कार्यशाळा

दाभोळ, ता. २५ ः दापोली शिक्षणसंस्था संचालित दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स महाविद्यालयाच्या आयक्यूएससीतर्फे नवीन शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी मुंबई विद्यापीठाच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजी विभागाच्या बहिशाल अभ्यासक्रमांचे प्रमुख प्रा. मंदार भानुशे आणि सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबईचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे हे प्रमुख मार्गदर्शक होते. प्रा. भानुशे यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणपद्धतीचा आकृतीबंध या विषयावर बोलताना नवीन धोरणानुसार शिक्षण हे विद्यार्थीकेंद्रित असेल. त्यामुळे शिक्षकांनाही अनेक कौशल्ये आत्मसात करावी लागतील किंवा असलेली कौशल्ये आणखी विस्तारित करावी लागतील, असे सांगितले.
डॉ. शिंदे यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचे क्रेडिट फ्रेमवर्क या विषयावर माहिती दिली. या धोरणातील अनेक क्लिष्ट संकल्पना त्यांनी साध्या आणि सोप्या शब्दात सांगताना त्यांनी त्यांच्या महाविद्यालयाची उदाहरणे दिली. त्यांच्या महाविद्यालयात येत्या जूनपासून हे नवीन धोरण राबवण्यासाठी कशी आणि काय तयारी त्यांच्या महाविद्यालयाने केली आहे हे पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून उपस्थितांसमोर मांडले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील ८० पेक्षा जास्त शिक्षक उपस्थित होते. यामध्ये हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज आणि सीनियर कॉलेजचे शिक्षक, प्राचार्य आणि आयक्यूएससी समन्वयक यांचा समावेश होता. या कार्यक्रमाला दापोली शिक्षणसंस्थेचे संचालक दिनेश नायक, मिहीर महाजन, प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे, आर्या भागवत आदी उपस्थित होते.
-