चिपळुणात आज तृणधान्य पदार्थ प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळुणात आज तृणधान्य पदार्थ प्रदर्शन
चिपळुणात आज तृणधान्य पदार्थ प्रदर्शन

चिपळुणात आज तृणधान्य पदार्थ प्रदर्शन

sakal_logo
By

चिपळुणात आज तृणधान्य पदार्थ प्रदर्शन

चिपळूण, ता. २५ ः कृषी विभागाच्यावतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य मिशनअंतर्गत रविवारी (ता. २६) चिपळुणात जिल्हास्तरीय कार्यशाळा व पौष्टिक तृणधान्य पदार्थ प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील माधव सभागृह येथे सकाळी १० ते सायं. ६ दरम्यान कार्यशाळा होणार आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन आमदार शेखर निकम, भास्कर जाधव यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी खरवते येथील शरदचंद्रजी पवार, अन्नतंत्र महाविद्यालयाचे प्रा. विक्रांत साळवी, कृषी संशोधन केंद्र शिरगांवचे डॉ. विजय दळवी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. एल. कुणकेरकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र माने यांनी दिली. ते म्हणाले, अनेक वर्षे तांदूळ, गहू या पिकांना प्राधान्य देण्यात आले. त्यांचे उत्पादनही वाढवले आहे; मात्र यामध्ये पौष्टिक तृणधान्ये मागे पडली. नाचणी, वरी, ज्वारी, बाजरी आणि हरिक ही तृणधान्ये शरीराच्यादृष्टीने पोषक आहेत; मात्र अशा पौष्टिक धान्याकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच त्याची माहिती लोकांना व्हावी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात तृणधान्यापासून बनवलेल्या विविध पदार्थांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. या वेळी जिल्ह्यातील शेतकरी, तृणधान्य उत्पादक तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र माने यांनी केले आहे. या वेळी कृषी मंडळ अधिकारी मनोज गांधी व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
.