स्वच्छता मोहीम

स्वच्छता मोहीम

rat252.txt

बातमी क्र..2 (पान 6 साठी, संक्षिप्त)

फोटो ओळी
-rat25p6.jpg-संगमेश्वर ः सोमेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता करणारे दुर्गवीरचे सदस्य.
--------
देवरूख, दुर्गवीर प्रतिष्ठान स्वच्छता मोहीम

साडवली ः दुर्गवीर प्रतिष्ठानच्यावतीने संगमेश्वर कसबा सोमेश्वर मंदिर परिसर स्वच्छता व श्रमदान मोहीम राबवून मंदिराचे संवर्धन व्हावे,
पर्यटकांनी भेट द्यावी हे ध्येय उराशी बाळगून सातत्याने मोहीम व उपक्रम राबवून प्रयत्न केले जात आहेत. याच अनुषंगाने नुकतीच सोमेश्वर मंदिर स्वच्छ्तामोहीम पार पडली तसेच चौथर्‍याचे काही ढासळलेले दगड पुन्हा वर आणून व्यवस्थित ठेवण्यात आले. मंदिरावरील झाडेझुडपे साफ करण्यात आली, मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या करण्यात आल्या, काशीविश्वेश्वर मंदिराकडून सोमेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग करण्यात आला. त्या दोन्ही मंदिरांमध्ये दलदल आहे. तिथे दगड टाकून मार्ग तयार केला. काशी विश्वेश्वर मंदिराचे दगड बाहेर रस्त्यालगत टाकलेले होते तेही मंदिराजवळ नेऊन ठेवले. बाजूची लहान 3 मंदिरेही झाडाझुडपांनी वेढली होती ती सुद्धा मोकळी करण्यात आली. या मोहिमेमध्ये दुर्गवीर प्रतिष्ठानचे निशांत जाकी, योगेश सावंत, भावेश सावंत, मंगेश शिवगण, दीप्ती साळवी, शिवम गायकवाड, रोशन भाटकर, भूषण बावधने, सिद्धेश भुजबळराव, स्वरूप नलावडे, पुजारी सतीश लिंगायत या सदस्यांनी सहभाग घेतला होता.
-----------

आनंदराव पवार महाविद्यालयामध्ये ग्रंथालयाचे उद्घाटन

चिपळूण ः श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे संचालित आनंदराव पवार महाविद्यालयामध्ये ग्रंथालय कक्षाचे उद्घाटन झाले. प्राचार्या डॉ. अनघा गोखले यांनी कॉलेजची माहिती दिली. विश्‍वस्त डॉ. मीनल ओक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला घरडा केमिकल कंपनीचे साईट इन्चार्ज आर. सी. कुलकर्णी त्याचबरोबर माजी आमदार रमेश कदम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन, घरडा केमिकल कंपनीचे जनरल मॅनेजर अनिल भोसले, अध्यक्ष उदय गांधी, कार्याध्यक्ष सई वरवाटकर, डॉ. अरुण पाटील, सुदेश पाथरे आदी उपस्थित होते. या वेळी ग्रंथालयाचे कॉन्ट्रॅक्टर आणि आर्किटेक्चर यांचा सत्कार रमेशभाई कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
------------
गवळी समाज जनगणनेसाठी आवाहन

चिपळूण ः तालुक्यात गवळी समाजाची जनगणना करण्यात येणार असून, त्यासाठी समाजबांधवांनी सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे नितीन ठसाळे यांनी केले आहे. महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट चिपळूण या शाखेची 24 मार्च 1980 ला स्थापना झाली. या शाखेचा 43वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. चिपळूण शाखेमध्ये 22 गावे गवळी समाजाची आहेत. सध्या समाजाची जनगणना करण्यात येणार आहे. समाजातील बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपली असून, आज दहावीच्या विद्यार्थ्यांचा शेवटचा पेपर आहे. तरी समाजाच्या जनगणनेला सहकार्य करावे, असे आवाहन ठसाळे यांनी केले आहे.
-----------

फोटो ओळी
-rat25p5.jpg- रत्नागिरी ः राज्यस्तरीय तायक्वॉंदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेले खेडमधील सोहम खामकर व मोहम्मद हमदुले.
------------
राज्यस्तरीय सबज्युनियर तायक्वॉंदो फाईट स्पर्धेत दोघांना सुवर्ण

खेड ः रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट असोसिएशनतर्फे आयोजित 32व्या राज्यस्तरीय सबज्युनियर तायक्वॉंदो फाईट स्पर्धेत खेड येथील शिवतेज आरोग्यसेवा संस्थेच्या बहुउद्देशीय सभागृहात शिकणाऱ्या दोन खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले आहे. खेड तायक्वॉंदो स्पोर्ट्स अॅकॅडमी अंतर्गत शिकणाऱ्या सोहम खामकर याने 25 किलो खालील वजनीगटात सुवर्णपदक तसेच मोहम्मद जैद वसीम हमदुले याने 27 किलो खालील वजनीगटात सुवर्णपदक प्राप्त केले. विजेत्या दोन्ही खेळाडूंची 25 ते 27 मार्च या कालावधीतील ओडिसा कट्टक येथे होणाऱ्या राष्ट्रीय तायक्वॉंदो फाईट स्पर्धेकरिता निवड झाली आहे. विजेत्या खेळाडूंचे रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश कररा, सचिव लक्ष्मण कररा, शशांक घडशी, मिलिंद इवलेकर, विनय तोडणकर, चंद्रकांत बनकर यांनी अभिनंदन केले. या दोन्ही खेळाडूंना अॅकॅडमी सचिव व प्रमुख प्रशिक्षक प्रशांत कांबळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
--------------

कळंबणीतील कबड्डी स्पर्धेत भरणेतील काळकाई संघ विजेता

खेड ः तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने गुढीपाडव्याच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे जिद्द क्रीडामंडळ कळंबणी या मंडळाच्यावतीने तालुकास्तरीय पुरुष गटाची निमंत्रित कबड्डी स्पर्धा नुकतीच झाली. या स्पर्धेत भरणे येथील काळकाई कला, क्रीडा केंद्र संघ विजेता ठरला. या संघाला 7 हजार 777 रुपये रोख पारितोषिक व आकर्षक चषक तर उपविजेत्या झोलाई युवा प्रतिष्ठान आंबवली या संघाला 5 हजार 555 रुपये आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईपटू झोलाई युवा प्रतिष्ठानच्या प्रथमेश यादव, उत्कृष्ट बचावपटू काळकाई कला, क्रीडाकेंद्राचा अथर्व धुमाळ तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून काळकाई कला, क्रीडा केंद्र भरणेचा शुभम बिर्जे यांना आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले.
---------
फोटो ओळी
-rat25p4.jpg ः खेड ः छत्रपतींचा भगवा 365 दिवसात 370 किल्ले सर करून अंतिम माउंट एव्हरेस्ट वर फडकवण्याचे ध्येय घेऊन निघालेल्या सुबोध गांगुर्डे या तरुणाला शुभेच्छा देताना वैभव खेडेकर व कार्यकर्ते.
-------------
महाराष्ट्र ते माउंट एव्हरेस्ट छत्रपतींच्या भगव्याची सायकल यात्रा

खेड ः रायगड जिल्ह्यातील रोहा येथील तरुण सुबोध गांगुर्डे याने छत्रपतींचा भगवा 365 दिवसात 370 किल्ले सर करून अंतिम माउंट एव्हरेस्ट वर फडकवण्याचे ध्येय निश्चित केले आहे. शुक्रवारी (ता. 24) भरणेनाका येथे त्याची भेट घेऊन मनसेचे वैभव खेडेकर यांनी व सहकाऱ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असून त्यांचा भगवा ध्वज 370 किल्ल्यावर डौलाने फडकवून अखेर हिमालयातील सर्वोच्च माउंट एव्हरेस्टवर फडकवण्याचे ध्येय मनात घेऊन सुबोध गांगुर्डे या तरुणाने सायकल यात्रा सुरू केली आहे. आजपर्यंत त्याने 107 दिवसात 110 किल्ले पूर्ण केले आहेत. खेड तालुक्यात आलेल्या गांगुर्डे याचे स्वागत मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी भरणे येथे केले. रायगड ते गोवा यात्रेत खेड भरणेनाका येथे वैभव खेडेकर यांनी त्याला प्रवासात आवश्यक वस्तूंची भेट देऊन पुढील प्रवासासाठी लागणाऱ्या सर्वतोपरी मदतीचे वचन दिले.
--------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com