प्लेसमेंटद्वारे नियुक्ती

प्लेसमेंटद्वारे नियुक्ती

- rat२५p१.jpg-
९१२९३
गुहागर ः इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन विभागातील प्लेसमेंट नियुक्त झालेल्या विद्यार्थ्यांसोबत मान्यवर.
-
वेळणेश्वरमधील विद्यार्थ्यांची प्लेसमेंटद्वारे नियुक्ती

गुहागर ः तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वरमधील विद्यार्थ्यांची प्लेसमेंटद्वारे नियुक्ती झाली आहे. नुकतेच प्लेसमेंट विभागातर्फे एकदिवसीय कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुणे येथील यु. नो. मिंडा, कायनेटिक ग्रीन प्रा. लि., अहमदनगर, व्हेरॉक, पुणे, सॉफ्टटेक हब, आबलोली, क्यू स्पायडर, बंगलोर, पी. एच. एन टेक्नोलॉजी, पुणे यासारख्या विविध कंपन्या महाविद्यालयात विद्यार्थी कॅम्पस मुलाखतीसाठी आले होते. महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन विभागातील अंतिम वर्षाच्या शंभर टक्के विद्यार्थांची प्लेसमेंट नियुक्ती झाली आहे. यामध्ये भक्ती पवार, पल्लवी मांडवकर, ऋत्विक नवरत, सृष्टी देवकर, श्रेयश जोशी, यश सावंत, करिष्मा चिवेलकर इत्यादी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र सोनी, उपप्राचार्य अविनाश पवार, विभागप्रमुख प्रा. गजानन खापरे, प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. भारत पवार आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आले.
-

कृष्णा महाजन स्मृती पुरस्कार पांडुरंग रेवाळेंना जाहीर

दाभोळ ः प्रसिद्धी आणि पैसा यांच्यापासून कोसो दूर अशा एका खेड्यात राहून वयाच्या २३व्या वर्षांपासून ५० वर्षे सातत्याने वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेऊन समाजप्रबोधनाचे अविरतपणे कार्य करणाऱ्या पांडुरंग सखाराम रेवाळे यांना (कै.) कृष्णामामा महाजन स्मृतिपुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. २ एप्रिलला एका समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. (कै.) कृष्णामामा महाजन स्मृति प्रतिष्ठानच्यावतीने समाजात विविध क्षेत्रातील समर्पित कार्य करणाऱ्या व्यक्तींचा (कै.) कृष्णामामा महाजन स्मृतिपुरस्कार देऊन गौरव केला जातो. यावर्षी समाजप्रबोधन क्षेत्रात कार्य करणाऱ्या दापोली तालुक्यातील निगडे येथील पांडुरंग सखाराम रेवाळे यांना हभप शिवाजीराव मोरे महाराज (जगत्गुरू तुकाराम महाराज यांचे वंशज) व विधान परिषदेचे सदस्य श्रीकांत भारतीय यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. २ एप्रिलला सायं. ४ वा. ए. जी. हायस्कूलच्या माधवराव कोकणे सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन (कै.) कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com