काँग्रेसचे मालवणात निषेध आंदोलन

काँग्रेसचे मालवणात निषेध आंदोलन

91326
मालवण : तालुका काँग्रेसच्यावतीने फोवकांडा पिंपळ येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

काँग्रेसचे मालवणात निषेध आंदोलन

केंद्राविरोधी घोषणा; लोकशाहीचा अंत केल्याचा आरोप

मालवण, ता. २५ : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करून या देशातील लोकशाहीचा अंत मोदी सरकारने केला असा आरोप करत तालुका काँग्रेसच्यावतीने आज फोवकांडा पिंपळ येथे काळ्या फिती लावून निषेध आंदोलन केले.
हुकुमशाही वृत्तीच्या मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने मोदी सरकार व भाजप हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात अनेक ठिकाणी खटले दाखल करून त्यांना अडकवण्याचे षड्‍यंत्र रचले आहे. अशाच एका प्रकरणात गुजरातच्या सुरत कोर्टाने गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे आणि याचाच आधार घेत आता त्यांची खासदारकी रद्द करत देशातील लोकशाहीचा अंत मोदी सरकारने केला असा आरोप यावेळी करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आज तालुका काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, अरविंद मोंडकर, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, श्रेयस माणगावकर, लक्ष्मीकांत परुळेकर, देवानंद लुडबे, किशोर नाचणोलकर, संदीप परब, पराग माणगावकर, मेघश्याम लुडबे, हेमंत माळकर, महेश अंधारी, श्रीकृष्ण तळवडेकर, लुईस मेंडीस, मधुकर लुडबे, योगेश्वर कुर्ले, आप्पा चव्हाण, सरदार ताजर, समीर आंगणे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com