
वेशभूषा स्पर्धेचा निकाल जाहीर
91332
वेंगुर्ले : वेशभूषा स्पर्धेतील विजेते स्पर्धक.
वेशभूषा स्पर्धेचा निकाल जाहीर
वेंगुर्लेत आयोजन; आचार्य, नार्वेकर, गावडे प्रथम
वेंगुर्ले, ता. २५ : चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षाला प्रारंभ झाला असून या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हिंदू धर्माभिमानी मंडळी यांनी शहरांमध्ये नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन केले होते. यातील वेशभूषा स्पर्धेचा निकाल जाहीर झाला.
या स्वागत यात्रेमध्ये शेकडो हिंदू धर्माभिमानी मंडळी सहभागी झाली होती. या स्वागत यात्रेनिमित्त तीन गटांमध्ये वेशभूषा स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये बालवाडी ते पहिली या गटातून अत्रेया आचार्य, दुसरी ते चौथी या गटातून प्रांजल नार्वेकर व पाचवी ते दहावी या गटातून मुग्धा गावडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तिन्ही गटांमध्ये एकूण ९८ स्पर्धक सहभागी झाले होते. बालवाडी ते पहिली या गटामध्ये द्वितीय उर्मी परब, तृतीय आराध्या राऊळ व उत्तेजनार्थ हेरंब राऊळ व रघुवीर काणेकर, दुसरी ते चौथी या गटामध्ये नवार द्वितीय, शुभ्रा अंधारी तृतीय, सानवी परब व दिव्या मालवणकर हिने उत्तेजनार्थ, पाचवी ते दहावी या गटामध्ये द्वितीय वरदा परब, तृतीय जयेश सोनुर्लेकर, उत्तेजनार्थ निरज पवार व आर्या जुवलेकर यांनी यश प्राप्त केले.
स्पर्धेचे परीक्षण संजय पाटील, प्रा. सचिन परुळकर, श्री. बागलकर, रमेश नार्वेकर, महेश बोवलेकर, श्री खवणेकर, अॅड. श्रीमती सुषमा खानोलकर, श्रीमती स्मिता मांजरेकर, श्रीमती मृण्मयी केरकर व श्रीमती रत्नप्रभा साळगावकर यांनी केले. ही स्वागत यात्रा व स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संयोजन समितीचे नियोजन प्रमुख श्री प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, अॅड.सौ.सुषमा खानोलकर, रामेश्वर देवस्थानचे ट्रस्टी श्री रवी परब व श्री यशवंत उर्फ दाजी परब, तसेच संजय पाटील, अजित राऊळ, अरुण गोगटे यांनी प्रयत्न केले.