कोकणातील नमन व जाखडी या कलाप्रकारांना मिळणार अनुदान

कोकणातील नमन व जाखडी या कलाप्रकारांना मिळणार अनुदान

(पान ५ साठीमेन)

नमन व जाखडी या कलाप्रकारांना मिळणार अनुदान

आमदार निकमांचा पाठपुरावा ; वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेंतर्गत मिळणार लाभ

संदीप घाग ः सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २५ ः नमन (खेळे) व जाखडी या प्रकारातील लोककलाकारांना राज्यात राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेअंतर्गत राज्यातील संघटित किंवा असंघटित प्रयोगात्मक लोककलेतील कोणत्याही पात्र कलाकारांना मानधन मिळू शकणार आहे. राज्यामध्ये अशा विविध कलाप्रकारातील अनेक कलाकारांना दरमहा समितीने नियुक्त केलेल्या श्रेणीत मानधन देण्यात येते. यामध्ये कोकणातील जाखडी व नमन/खेळ या प्रकारातील या योजनेचे निकष पूर्ण करणारे व निवड समितीने निवडलेले कलाकारही योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे आता कोकणातील नमन व जाखडी कलावंतांना मानधन मिळणार आहे.
कोकणात होळी, विवाहसोहळा व सार्वजनिक कार्यक्रमात प्रसंगी नमन, भारूड या लोककलेच्या माध्यमातून कला जोपासणारे कलावंत उपेक्षित असून, या कलाकारांना शासनस्तरावर अनुदान मिळावे, अशी मागणी आमदार निकम यांनी अधिवेशनात लावून धरली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करून या लोककला प्रकारचे इत्थंभूत सर्व्हेक्षण करून त्याची माहिती जमा करून तज्ञ समितीमार्फत आवश्यकतेनुसार याबाबतची कार्यपद्धती व इष्टांक ठरवण्यात येणार आहे. कोकणातील कलाकारांना याचा फायदा होणार आहे.
नमन (खेळे) व जाखडी ही ग्रामीण कलाप्रकार कोकणामध्ये प्रसिद्ध असून, अनेक वर्ष या कलाप्रकाराच्या माध्यमातून अनेक कलावंत आपली कला प्रदर्शित करून मनोरंजन व प्रबोधन, जनजागृती करण्याचे काम करत आहेत; मात्र या कलाप्रकारांना अनुदान व पेन्शन योजना शासनाकडून दिली जात नव्हती. बदलत्या काळानुसार खेळे, नमन, जाखडीसारखे अभिजात कोकणी कलाप्रकार काळाच्या ओघात गडप होण्याचा धोका संभवत असल्याने मध्य कोकणातील या पारंपरिक व सांस्कृतिक कलाप्रकारांना ऊर्जितावस्था देणे, त्या टिकवून ठेवणे ही काळाची गरज असल्याचे सरकारला निकम यांनी पटवून दिले. निकम यांच्या मागणीला विधानसभा (आमदार) सदस्य नीलेश लंके, आदिती तटकरे, अतुल बनले यांनी ही मागणी उचल धरली होती.
ही लोककला जिवंत ठेवण्यासाठी चित्रपट, नाटक, अन्य क्षेत्रातील विविध कलाकारांना शासनस्तरावर मिळणाऱ्या अनुदानाप्रमाणे कोकणातील कष्टकरी, शेतकरी काबाडकष्ट करून ही कला जोपासत आहे. ग्रामीण कलाकारांना अनुदान आणि कलाकार पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी आमदार निकम यांनी विधानभवनात सरकारचे लक्ष वेधले होते.
-
कलापथकांना प्रयोगांसाठी अनुदान

कलापथक/कलाप्रकार*प्रयोगासाठी अनुदान* प्रयोगसंख्या*पथकास मिळालेली रक्कम* पथकांची संख्या
ढोलकी फड/तमाशा फड*३०,०००*२०*६ लाख*१०
हंगामी तमाशा फड/दशावतार*१५०००*२०*३०*४०
खडी गंमत/कलापथके लावणी*७०००*२०*१ लाख ४० हजार*३०
कलापथके
(संगीत बारी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com