‘खारेपाटण पंचक्रोशी’चे कार्य गौरवास्पद

‘खारेपाटण पंचक्रोशी’चे कार्य गौरवास्पद

91354
खारेपाटण : येथील शिक्षण प्रसारक मंडळाला वैभववाडी रोटरीने बेंच प्रदान केले.

‘खारेपाटण पंचक्रोशी’चे कार्य गौरवास्पद

संतोष टक्के; वैभववाडी रोटरीतर्फे १०० बेंच प्रदान

खारेपाटण, ता.२५ : रत्‍नागिरी आणि सिंधुदुर्गच्या वेशीवरील खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण संस्थेने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्‍ध करून दिली. या संस्थेचे अनेक विद्यार्थी देशपातळीवर चमकले. या संस्थेचे कार्य गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन रोटरी क्‍लब वैभववाडीचे अध्यक्ष संतोष टक्‍के यांनी केले.
खारेपाटण येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला रोटरी क्‍लबतर्फे १०० बेंचेस प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात श्री.टक्‍के बोलत होते. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. कांबळे यांनी महाविद्यालयाच्या निर्मितीपासून आजवरच्या कार्याची माहिती दिली. तर रोटरी क्‍लबने १०० बेंचेस उपलब्‍ध करून दिल्‍याबद्दल आभार मानले. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनीही रोटरीकडून सातत्‍याने मिळणाऱ्या सहकार्याबद्दल आभार मानले. यावेळी रोटरी क्लबचे संजय रावराणे, प्रशांत गुळेकर, तेजस अंबेकर तसेच संस्थेचे उपाध्यक्ष रघुनाथ राणे, महेश कोळसुलकर, विजय देसाई, राजेंद्र वरुणकर, मुख्याध्यापक श्री.सानप आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com