रत्नागिरी- भाजपची रत्नागिरीत जोरदार निदर्शने

रत्नागिरी- भाजपची रत्नागिरीत जोरदार निदर्शने

rat25p12.jpg
91351
रत्नागिरीः काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात निदर्शने करताना दक्षिण रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्यासमवेत पदाधिकारी, कार्यकर्ते.
-----------
राहुल गांधींविरोधात भाजपची निदर्शने
रत्नागिरी, ता. २५ः मोदी या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात शनिवारी (ता. २५) भारतीय जनता पक्षाने जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली जयस्तंभ येथे निदर्शने केली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी या आडनावावरून अपमानास्पद टिप्पण्णी करताना ओबीसी समाजाचा आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाजबांधवांचा अपमान केला. न्यायालयाने याबद्दल राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी हे आपल्या घराण्यामुळे आलेल्या राजेशाही मानसिकतेततून बाहेर पडले नाहीत, असेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसते. न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलने करून न्यायालयाचा व संविधानाचा अपमान करत आहेत. काँग्रेस नेत्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल भाजप न्यायालयात दाद मागेल, असे या वेळी अॅड. पटवर्धन यांनी सांगितले.
या वेळी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जोरदार निदर्शने केली. या वेळी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, अॅड. बाबासाहेब परूळेकर, सचिन वहाळकर, मुन्ना चवंडे, सचिन करमकर, उमेश कुळकर्णी, राजू तोडणकर, मनोज पाटणकर, राजू भाटलेकर, दादा ढेकणे, शैलेश बेर्डे, धनंजय पाथरे, नितीन जाधव, उमेश खंडकर, शोनाली आंबेरकर, प्राजक्ता रूमडे, सायली रसाळ, संपदा तळेकर आदी उपस्थित होते.

-- बातमीदार- मकरंद पटवर्धन... 25.3.2023

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com