दोन ग्रामसभेत परस्पर विरोधी निर्णयाने जनता हैराण

दोन ग्रामसभेत परस्पर विरोधी निर्णयाने जनता हैराण

आंजर्लेत दगड वाहतुकीवरुन संभ्रम
एका ग्रामसभेत परवानगी तर दुसऱ्या सभेत विरोध; खाडीमुखाशी रिटेनिंग वॉलचे काम
दाभोळ, ता. २५ः दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडीमुखाशी असलेला गाळ काढून तेथे रिटेनिंग वॉल बांधण्यात येणार असून, या रिटेनिंग वॉलसाठी लागणाऱ्या दगड वाहतुकीसाठी आंजर्ले समुद्रमार्गाने डंपर वाहतुकीला पर्यावरणप्रेमी जनतेने कडाडून विरोध केला आहे; मात्र समुद्रकिनारी होणाऱ्या बंधाऱ्याचे समर्थन केले आहे. एका ग्रामसभेत परवानगी; पण काही दिवसांनी झालेल्या दुसऱ्या ग्रामसभेत विरोधामुळे जनता हैराण झाली आहे.
आंजर्ले समुद्रकिनारी या वर्षी दोन मोठ्या कामांना मंजुरी आहे. त्यापैकी तरीबंदर चारपोल येथे होणाऱ्या रिटेनिंग वॉलसाठी लागणाऱ्या दगड वाहतुकीसाठी समुद्रमार्गाने दगड वाहतूक करण्यास पर्यावरणप्रेमी जनतेने कडाडून विरोध केला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामसभेमध्ये समुद्रावर कोणत्याही प्रकारचे वाहन नेण्यास मनाई करण्याचा ठराव वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी करून घेतला होता व तसा ठरावही मंजूर झाला असल्याचा दाखला देत पर्यावरणप्रेमींनी या वाहतुकीला विरोध केला आहे; मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामसभेत या कामाचे ठेकेदार यांनी कासवमित्रांशी चर्चा झाली असल्याचे सांगितले व सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाहतूक करण्यास हरकत नाही, अशी माहिती दिल्याचे सांगितले. त्यामुळे त्या ग्रामसभेने जाधव यांना काम सुरू करण्यास हरकत नसल्याचे सांगितले; मात्र काल झालेल्या ग्रामसभेत पुन्हा विरोध झाल्याने काम सुरू करण्यात आलेले नाही. एका ग्रामसभेत परवानगी; पण काही दिवसांनी झालेल्या दुसऱ्या ग्रामसभेत विरोध यामुळे जनता मात्र हैराण झाली आहे. गावाच्या विकासासाठी काही गोष्टी शिथिल कराव्यात, असे अनेक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
---------
कोट
कालची ग्रामसभा ही तहकूब झाली होती. त्यामुळे ग्रामसभेत विरोध होण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही; परंतु या ग्रामसभेसाठी मी उपस्थित होतो. सभा तहकूब झाल्यावर ठेकेदार जाधव तिथे आले असता सर्व ग्रामस्थांनी त्यांना कासव सोडायच्या वेळेत आपण तेथून वाहतूक करू नये असे सांगितले. कोणीही विरोध केला नाही. त्या वेळात आपण गावातील बंधाऱ्यासाठी दगड वाहतूक करावी, असे सुचवले आहे.
- मकरंद मादलेकर, ग्रामस्थ, आंजर्ले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com