पान एक-सिंधुदुर्गात लोकसभेसाठी स्थानिक नेतृत्वाचाच विचार

पान एक-सिंधुदुर्गात लोकसभेसाठी स्थानिक नेतृत्वाचाच विचार

91373 - विनोद तावडे (मध्यभागी)


लोकसभेसाठी सिंधुदुर्गात
स्थानिक नेतृत्वाचाच विचार
विनोद तावडे ः मी इच्छुक नाही
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २५ ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी मी इच्छुक नाही, तर निवडणुकीच्या आधी चार-पाच महिने स्थानिक नेतृत्वाचाच विचार करून नाव निश्‍चित होईल, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी आज दिली. राहुल गांधींची खासदारकी जाणे हे काही ठरवून झालेले नाही; पण विरोधक या मुद्द्यावर दुटप्पीपणाचं राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या लोकसभा प्रवास योजनेची विशेष बैठक तळेरे येथे झाली. त्यावेळी प्रदेश सहसंयोजक प्रमोद जठार, प्रदेश सचिव नीलेश राणे, कोकण संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, आमदार नितेश राणे, लोकसभा प्रभारी संदीप लेले, जिल्हाध्यक्ष राजन तेली, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, अतुल काळसेकर, अजित गोगटे उपस्थित होते.
श्री. तावडे म्हणाले, “मला मतदारसंघ बांधणीची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडायची आहे. मी, लोकसभेसाठी इच्छुक नाही. स्थानिक पातळीवरील नेतृत्वाचाच विचार होणार आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी चार ते पाच महिने उमेदवाराचे नाव निश्‍चित होणार आहे.’’
तावडे म्हणाले, ‘‘राहुल गांधींची खासदारकी घटनेनुसार आणि कायद्याने रद्द झाली आहे. यापूर्वी लालुप्रसाद यादव यांच्यासह सहा जणांची खासदारकी रद्द झाली होती. त्यावेळी काँग्रेसने ती कारवाई योग्य ठरवली होती. आज राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष दुटप्पीपणाचं राजकारण करत आहे. एका मोठ्या पक्षाच्या नेत्याची खासदारकी जाणीवपूर्वक घालवता येत नाही. कायदा आणि घटनेनुसारच कारवाई झाली आहे. राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. सगळा समाजच चोर आहे, असं ते कसं काय म्हणू शकतात.’’
तावडे म्हणाले, ‘‘२०१९ च्या लोकसभेला भाजपला ३०३ जागा मिळाल्या, तर २०२४ ला उर्वरित १०७ जागा मिळाव्यात, यासाठी काम सुरू आहे. त्याअनुषंगाने राजकीय वस्तुस्थितीचे विश्लेषण करून नेत्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. १०७ पैकी ७० ते ८० जागा जिंकण्यासाठी रणनीती आहे. त्यासाठी ४० केंद्रीय मंत्री बूथपातळीपर्यंत जाऊन केंद्राच्या योजना कशा पोहोचल्या, त्याबाबत सामान्यांचे मत काय आहे आणि अजून बदल काय पाहिजे, याबाबत मते जाणून घेत आहेत.’’

विरोधी पक्ष मजबूत नाही
लोकशाहीमध्ये विरोधी पक्षही सक्षम असायला हवा; पण राज्यात आणि देशातही विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष नेताही मजबूत नाही, अशी खंत तावडे यांनी व्यक्त केली. राज्यात फडणवीस-शिंदे सरकार चांगले काम करत असल्याचेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com