आवळेगावात गोठ्याला आग

आवळेगावात गोठ्याला आग

91377
आवळेगाव : येथील पशुपालक श्री कानसे यांच्या गोठ्याला लागलेल्या आगीची पाहणी करताना गटविकास अधिकारी विजय चव्हाण दादा साईल डॉ देसाई सरपंच व ग्रामस्थ.


आवळेगावात गोठ्याला आग

फौजदारवाडीतील घटना; एक जनावर होरपळून जागीच ठार

कुडाळ, ता. २५ : आवळेगाव फौजदारवाडी (ता.कुडाळ) येथील पशुपालक शेतकरी सत्यवान गणपत कानसे यांच्या गुरांच्या गोठ्याला आज दुपारी आग लागून एक जनावर होरपळून जागीच ठार झाले. ४ जनावरे होरपळली असून शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. घटनास्थळी पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी भेट देऊन प्रशासन स्तरावर सहकार्य केले जाईल, असे सांगितले.
या आगीत गोठा व गवताची गंजीसुद्धा जळून खाक झाली. आवळेगाव फौजदारवाडी येथील पशुपालक सत्यवान कानसे यांच्या घरानजिक वनवा लागला होता. ही आग वाढत गुरांच्या गोठ्यापर्यंत आली. या गोठ्यात पाच जनावरे होती. यामध्ये म्हैस, रेडे व वासरांचा समावेश होता. श्री कानसे एकटेच घरी होते. आग गोठ्यापर्यंत येताच यामध्ये ५ जनावरे होरपळली. एक जागीच मृत झाले. यामध्ये पशुपालकही गुरांना वाचविण्यासाठी प्रयत्न करताना किरकोळ जखमी झाले. याबाबत गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष दादा साईल, सरपंच पूर्वा सावंत, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ सुरेंद्र देसाई, ग्रामसेविका पेडणेकर, पोलीस पाटील एम पी राठोड, तलाठी मनीषा शिपुकडे, उपसरपंच विवेक कुपेरकर, अमित तावडे आदींनी भेट दिली. गटविकास अधिकारी श्री चव्हाण यानी कानसे यांना धीर देत याबाबत
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक प्रजित नायर यांना याबाबतची माहिती दिली. संबंधित कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन या जनावरच असल्याने या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यांचा गोठा जळाला तसेच गवताच्या गंजीला आग लागल्यामुळे या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
---
नुकसानग्रस्तांना तातडीने मदतीचा हात
श्री चव्हाण यांनी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागमध्ये ४० टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे या पशुपालकासाठी मंजूर करावी, अशी मागणी केली. जो गोठा जळाला त्याला एमआरजीएसमधून पंचायत समितीमधून गोठा देण्याचे आश्वासन दिले. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई यांच्याबरोबर चर्चा झाली. त्यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीमधून आवश्यक सहकार्य करण्याचे ठरले. या गुरांना पाऊस पडेपर्यंत लागणारा चारा हा ग्रामपंचायत माध्यमातून देण्यासाठी ग्रामपंचायत आवळेगावने पावले उचलली आहेत. होरपळलेल्या गुरांवर डॉ. सुरेंद्र देसाई यांनी तातडीने उपचार सुरू केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com