कुडाळ येथे शिमगोत्सवाचे उद्‍घाटन

कुडाळ येथे शिमगोत्सवाचे उद्‍घाटन

91401
कुडाळ : आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिमगोत्सव कार्यक्रम उद्‍घाटनप्रसंगी गौरीशंकर खोत आदी.(छायाचित्र ः अजय सावंत)

कुडाळ येथे शिमगोत्सवाचे उद्‍घाटन
कुडाळ, ता.२५ ः कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कुडाळ तालुक्यातर्फे आज सायंकाळी येथील क्रीडा संकुल येथे शिमगोत्सव (रोंबाट) कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन ज्येष्ठ शिवसैनिक भास्कर गावडे यांच्या हस्ते झाले.
आमदार नाईक यांचे यावेळी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, सहसंपर्क प्रमुख गौरीशंकर खोत, सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, प्रकाश जैतापकर, तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक सचिव काका कुडाळकर, प्रसाद रेगे, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, उपनगराध्यक्ष तथा युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, माजी उपसभापती जयभारत पालव, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, सचिन कदम, अतुल बंगे, विकास कुडाळकर, नगरसेवक उदय मांजरेकर, किरण शिंदे, संतोष शिरसाट, नगरसेविका सौ. सई काळप, सौ.श्रेया गवंडे, सौ.ज्योती जळवी, सौ.श्रुती वर्दम, महिला आघाडी विधानसभा संघटक सौ.श्रेया परब, तालुका संघटक सौ.स्नेहा दळवी, विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, सचिन काळप, शेखर गावडे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, उपशहरप्रमुख गुरुनाथ गडकर सचिन कदम आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com