दुर्धर आजारग्रस्त महिलेस नाभिक संघटनेतर्फे मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुर्धर आजारग्रस्त महिलेस
नाभिक संघटनेतर्फे मदत
दुर्धर आजारग्रस्त महिलेस नाभिक संघटनेतर्फे मदत

दुर्धर आजारग्रस्त महिलेस नाभिक संघटनेतर्फे मदत

sakal_logo
By

दुर्धर आजारग्रस्त महिलेस
नाभिक संघटनेतर्फे मदत
तळेरे, ता. २५ : सातरल येथील नाभिक समाजातील नाभिक हिरकणी पुरस्कार प्राप्त संपदा चव्हाण या दुर्धर आजाराने पीडित महिलेस कणकवली महिला नाभिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील नाभिक बांधवांना मदतीसाठी आवाहन केले होते. या आवाहनाला नाभिक बांधवांनी प्रतिसाद देत सुमारे १५ हजार रुपयांचा मदत निधी गोळा केला.
यासाठी कणकवली नाभिक संघटना महिला आघाडीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चव्हाण यांना मदत करण्याचे आवाहन केले. त्यानुसार जमा झालेली रक्कम चव्हाण यांच्या घरी जाऊन सुपूर्द करण्यात आली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर, जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण, कणकवली तालुकाध्यक्ष रोशन चव्हाण, कार्याध्यक्ष संजय कुबल, कणकवली शहराध्यक्ष अनिल शिंदे, उपाध्यक्ष नीलेश चव्हाण, खजिनदार मनोज चव्हाण, जिल्हा सल्लागार सुभाष चव्हाण, महिला तालुकाध्यक्षा तेजस्विनी कुबल, कार्याध्यक्षा प्रिया चव्हाण, कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष दशरथ चव्हाण, महिला सचिव हेमांगी अणावकर, जिल्हा महिला खजिनदार शिवानी चव्हाण, जिल्हा सदस्या रचना चव्हाण, अस्मिता अणावकर, तालुका प्रसिद्धी प्रमुख प्रणय चव्हाण, महिला सहसचिव ईश्वरी कुबल, ज्येष्ठ सल्लागार अरुण चव्हाण, माजी तालुकाध्यक्षा संजना चव्हाण आदी नाभिक बांधव उपस्थित होते.