रंगभूमी दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंगभूमी दिन
रंगभूमी दिन

रंगभूमी दिन

sakal_logo
By

rat262.TXT

बातमी क्र. 2 (टूडे 1 साठीमेन)
(टीप- हाफपेजच्या खालपर्यंत घ्यायचे आहे.)

फोटो ओळी
-
rat26p1.jpg- ः
91448
सुनील बेंडखळे
rat26p2.jpg- ः
91449
दीप्ती कानविंदे
rat26p3.jpg-ः
91450
श्रीकांत पाटील
rat26p4.jpg- ः
91451
अमेय धोपटकर
rat26p5.jpg- ः
91452
समीर इंदुलकर
-
जागतिक रंगभूमी दिन विशेष ------लोगो

नाटक जगविण्याची उर्मी हवीय...

आजच्या जागतिक रंगभूमी दिनी जिल्ह्यातील दोन पिढ्यातील रंगकर्मींशी ‘सकाळ’ने संवाद साधला. या चर्चेतून काही महत्वाची निरीक्षणे पुढे आली. जुनी-जाणती पिढी कोकणात नाटक करत आली आहे. आता त्यांच्या जोडीला नव्या दमाचे तरुण रंगकर्मीही काम करत आहेत. मात्र कोकणी माणूस नाटकवेडा म्हणताना अस्मिता फुलली, तरी वास्तवात नाटक आणि नाट्यकर्मी यांची स्थिती फारशी चांगली नाही. नाट्यसंस्था स्थापून नाटक करणे हे आजही पदराला खार लावणारे आहे. तालुक्याच्या पातळीवर असणारी नाट्यगृहे समस्यांच्या गर्तेत आहेत. तरीही नवे लेखक, नवे कलाकार, तरुणाचा जोश आणि आजचे प्रश्न मांडणारे तरुण रंगकर्मी पुढे येत आहेत. ही आश्वासक गोष्ट असली तरी पुरेशी नाही. याआधी नाटकं जगवणारी पिढी होती, तशी आज दिसत नाही. नाटक आणि नाट्यव्यवसायाशी निष्ठा कमी पडते की काय, अशी शंका आज निर्माण झाली आहे. याच काळात संगीत मल्लिका नाटकामुळे भाषेचे मिश्रण असलेले नाटक आधुनिक संगीताद्वारे, आधुनिक तंत्राद्वारे रंगमंचावर आले आहे. पारावरचे नाटक किंवा लोकनाट्य जसे लवचिक प्रयोग करू शकते, तसे व्यावसायिक नाटकांना शक्य नाही. तरीही अशा प्रयोगांचे प्रमाण वाढले आहे. नव्या लोकांची उमेद कमी झाली की काय, अशी शंका मात्र काहीवेळा येते. त्यांचे टीमवर्क कमी पडते की जिद्द यावर नेमके भाष्य करणे कठीण आहे. मात्र यशाचा शॉर्टकट अनेकजणांना हवा असतो. आजच्या नाट्यकर्मींच्या प्रयत्नात सातत्य कमी असले तरी आजचे तरुण रंगकर्मी सामाजिक प्रश्नाना थेट भिडतात. ही धम्मक त्यांच्यामध्ये आहे. याआधी हौशी नाट्यकर्मींनीही हे प्रश्न थेट हाताळले नव्हते. तरुण रंगकर्मींमध्ये प्रश्नांची जाणीव आहे.
-
लोककलांचे आधुनिक स्वरुप भावणारे

लहानपणापासून लोककला पाहत होतो. गावात होणाऱ्‍या नमन, खेळ्यांनी कात टाकत त्याचे स्वरूप हळूहळू नाटकांप्रमाणे होऊ लागले. नमनांचे प्रयोग मुंबईतील थिएटरमध्येही होऊ लागले. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. कोकणातील लोक ही लोककला आवडीने पाहतात; मात्र विदर्भ, मराठवाड्यातील प्रेक्षकवर्गाला तिन तासाहून अधिक काळ खिळवून ठेवणारा कार्यक्रम करण्यासाठी याच विचारांमधून लोकनाट्यांचा अंश असलेल्या ‘कोकणचा साज, संगमेश्‍वरी बाज’ या संगमेश्‍वरी बोलीवर आधारित लोकनाट्याचा उदय झाला. नाटक, एकांकिका, लोकनाट्य या सर्वांमध्ये ''कोकणचा साज...'' हा कार्यक्रम फारच वेगळा आणि लोकांच्या पसंतीस उतरणारा ठरत आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत या कार्यक्रमाची लोकप्रियता आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये साडेतिनशेहून अधिक प्रयोग यशस्वीपणे त्यांनी केले आहेत. मोठ्या रंगमंचापासून ते अगदी एखाद्या घराच्या अंगणामध्येही या लोकनाट्याचे प्रयोग केले जात आहे. ठरलेल्या ढाच्याच्या स्क्रिप्टबरोबरच सात्त्याने समाविष्ट केलेले पंचेस या कार्यक्रमाचे वेगळेपण आहे. नाटक, नमन, जाखडी अशा विविध लोककलांचा समावेश असलेला दोन तासांचा कार्यक्रम लोकांना भुरळ घालत आहे.

फोटो
सुनील बेंडखळे (रंगकर्मी)

* प्रयोगाच्या दर्जाशी कधीही तडजोड करत नाही
* चालू घडामोडींवर आधारित स्क्रिप्टमध्ये बदल
* तिवरे धरणावेळी मदतीसाठी सामाजिक उपक्रम
* वादकांचा नाटकाच्या यशात मोठा वाटा
* आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य पध्दतीने वापर
-------
नाटक टिकवायचे या जाणिवेने आजही काम

सत्तरच्या दशकात नाटक करणे जिकिरीचे होते. नाटकाला मोठा प्रेक्षक होता. प्रेक्षकांचा पाठिंबा होता. मात्र प्रायोगिक स्पर्धांचे आणि त्याआधी प्रायोगिक नाटकांचे लोण जिल्ह्यामध्ये यायचे होते. 1979 साली बसणी पंचक्रोशी ग्रंथालय आणि त्यानंतर 88 साली समर्थ रंगभूमी अशी नाट्यसंस्था स्थापून आजवर रंगभूमीची सेवा सुरू आहे. नाटक टिकवायचंय या जाणिवेने आजही काम करतोय. नाटक करायचे हा किडा असलेली मंडळी एकत्र येत. मात्र हा मामला उत्सवासाठी नाटक करणाऱ्या हौशी कलाकारांपेक्षा थोडा वेगळा, अधिक नाट्यप्रेम किंवा नाट्यवेड असणारा होता. त्यामुळे पदराला खार लावून आम्ही उभे राहिलो. त्याकाळी जिल्ह्यात हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच नाट्यसंस्था होत्या. रंगकर्मींच्या कामगिरीची नोंद घ्यायची म्हटली तर ''एक शून्य रडते आहे'' यासारखे प्रायोगिक नाटकही आम्ही बसवले. जिल्ह्यात त्याला त्यावेळी प्रेक्षक नव्हता, पण नवे नाटक करायची जिद्द होती. त्याकाळी स्व. डॉ. दिलीप श्रीखंडे, बाजीराव निकम, मनोज कोल्हटकर, आकाशवाणी गोविंद मोकाशी, डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्यासारख्या लेखकांनी नाटके लिहिली. आता गावागावात हौशी रंगमंच आणि नव्या दमाचे रंगकर्मी आहेत. मात्र संस्थात्मक काम करण्याची चिकाटी आणि संयम त्यांच्यापाशी दिसत नाही. उद्या भूमिका, परवा बक्षीस अशा भावनेने काम करता नये.
फोटो
- श्रीकांत पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी

* गावागावात हौशी भरपूर रंगमंच
* संस्थात्मक काम मात्र कमी
* पारावरील संस्था अजूनही टिकून
* ''रंगवर्धन’ प्रमाणे एकत्र येणे आवश्यक
* नाटक टिकवायचंय ही भूमिका हवी

------------
युवा रंगाकर्मींची चांगली जोड

जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने काही नाट्य विचार मांडायचा झाला तर तो असा की रत्नागिरीच्या रंगमंचाला आता युवा रंगाकर्मींची चांगली जोड मिळते आहे. येथील कलाकार, रंगकर्मी उत्सवी रंगभूमीवर अविरत काम करत आहे अभिनय करणारे गुणी अभ्यासू अभिनेते देखील कार्यरत आहेत. एकांकिका मधून काम करणारा मोठा वर्ग आहेच पण त्यासोबतच संगीत नाटकात काम करणारा मोठा गट आहे. गायिका अभिनेत्री आहे या मध्ये नव्याने पदार्पण करणारे ही खूप जण आहेत, उत्तम वादन करणारे वादक आहेत, तबला, हार्मोनियम आणि ऑर्गन तिन्ही वाद्याना उत्तम न्याय देणारी मंडळी आज रत्नागिरीतून तयार होत आहेत. हे पहाता रत्नागिरीचे भविष्यातील रंगचित्र अतिशय आशादायी वाटते आहे. रत्नागिरीतील रंगावर्तुळाशी काही संवाद साधू इच्छितो. तो असा की आपल्याला जागतिक व्हावं लागणार आहे. तर ते कसं? कालानुरूप नवे प्रवाहं हे नाटकांमध्ये देखील येत आहेत, नवे तंत्र, नवे विषय नव्या विचारांची नाटक या प्रवाहासोबत येत आहेत त्यांना आपण आपलंसं करायला हवं आहे. काळानुरूळ प्रेक्षकांच्या संवेदना बदलत जात आहेत. काल ज्या दृष्याने समाजमनावर आघात होत असे आज तेच दृष्य सहाजिक होऊनही गेलं असेल. तेव्हा नाटकाची निर्मिती करत असताना हे प्रेक्षक स्वीकारणारच नाहीत अशी नकारघंटा न वाजवता नव्या दमाने निर्मिती करायला हवी.
फोटो
अमेय धोपटकर
लेखक संगीत मल्लिका
-
* तरुणाईचा ओघ वाढला आहे
* संगीत नाटकातील काव्य वृत्तबद्ध हवे
* नव्या विचारांच्या संहिता येत आहेत
* नवीन तत्रांची मागणी नवोदितांकडून
* कलाकारांचा भाषेचा अभ्यास असावा

-
एकांकिका स्पर्धाद्वारे कलाकारांना वाव


मराठी नाट्य परिषदेने मराठी रंगकर्मीना प्लॅटफॉर्म म्हणून एकांकिका स्पर्धा आयोजित करून कलाकारांच्या कलेला वाव दिला. अनेक कलाकार यातून घडले. परंतु दुर्दैवाने रत्नागिरीत एकांकीका स्पर्धांना अपेक्षित प्रेक्षकवर्ग मिळत नाही. त्यामुळे शासकीय नाट्य स्पर्धांचे प्रमाण कमी झाले आहे. कणकवलीत ज्या प्रमाणे चांगला प्रेक्षकवर्ग तयार झाला आहे, तसा दर्जेदार आणि दर्दी प्रेक्षेकवर्ग रत्नागिरीत तयार करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. मराठी नाट्य परिषदेकडुन रंगभुमिदिन आणि 5 नोव्हेंबरला जागतिक रंगभुमीदिन साजरा केला जातो. यामध्ये जगातील 90 देश सामिल होतात. त्यानंतर शंकर घाणेकर एकांकीका स्पर्धा घेण्यात आली. मराठी बोलीभाषा स्पर्धा घेण्यात आली. यापूर्वी राज्य नाट्यस्पर्धेचे केंद्र हे चिपळुण होते. समाज कल्याण विभागाचे अधिकारी देखील इथुन जात होते. मात्र तेव्हा चिपळुणचे नाटक असले की, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असे. रत्नागिरीचे नाटक असले की अल्पप्रतिसाद मिळत होता. आम्ही अनेक प्रयत्न करून रत्नागिरीत हे केंद्र आणले. खातु नाट्य मंदिरात प्रयोग घेण्यात येत होते. परंतु त्याला अपेक्षित सुविधा नव्हत्या. त्या एका दिवसात आम्ही उभारल्या आणि हे केंद्र राखुन ठेवले. राज्यस्तरिय संगित नाट्य स्पर्धा सुरू झाल्यानंतर ज्या जिल्ह्याचे नाटक पहिले येईल, त्या जिल्ह्यात पुढीची स्पर्धा घेण्याचे अलिखत धोरण ठरले.

फोटो
-समीर इंदुलकर (मराठी नाट्य परिषद सदस्य)

* खाऊ गल्लीची जागा नाट्यगृची आहे.
* ज्यांचा प्रयोग त्याची वाहने लावण्यासाठी जागा
* नाट्यगृहाला सुरक्षा पुरवण्याची गरज आहे
* प्रयोग नसला तरी नाट्यगृह उघडे असते
* कोणीही येतो, बसतो, घाण करून निघुन जातो

-
आता मुलीना घरातून चांगला पाठिंबा

अभिनय, नाटकाचे अंग यांचे ज्ञान उपजतच असणे आवश्यक आहे. अर्थात शिबिरांतून किंवा अभ्यासातून, अनुभवाने नाट्य अभिनयाचे तंत्र उमगले पाहिजे. पूर्वीच्या काळात पारावरची नाटकं असोत वा स्पर्धेची नाटकं आणि एकांकिका यांत फक्त दोन-तीन महिला अभिनेत्री कार्यरत होत्या. परंतु गेल्या दहा वर्षांत अभिनेत्रींची संख्या वाढली आहे. नाट्यरंगमंचासह टीव्ही मालिका, चित्रपट, वेब सिरीज यांतून या कलाकारांना मोठी संधी मिळू लागली आहे. मी शिर्के हायस्कूलला शिकताना दोन-तीन वेळा बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाच्या नाट्य वाचन स्पर्धेत भाग घेतल्याचे आठवते. तेव्हा अभिनय क्षेत्रात येईन असे काही ठरले नव्हते. परंतु ते आवडायचे आणि मग इकडे प्रवास सुरू झाला. कॉलेज जीवनात एकांकिका स्पर्धा करायचे. अलिकडे या स्पर्धांची संख्या वाढली आहे. परंतु संधी लगेच मिळावी असे नव्या कलाकारांचे उद्दिष्ट असते. माझ्या उमेदीच्या काळात असे नव्हते. संधी मिळाली तर नाटकात जायचे. माझ्या पिढीतल्या कलाकारांनाही घरातून एवढा पाठिंबा नव्हता. परंतु आता मुलगी नाटकात किंवा मालिकेत अथवा वेब सिरीजमध्ये जाणार असेल तर किंवा या क्षेत्रात काही करायचे आहे, असे ठरवले तरी घरातून पाठिंबा चांगला मिळत आहे. आम्ही नाटक करण्यासाठी अनेक दिवस वाचन करतो व त्यावर चर्चा केली जाते. कमी वेळेत नाटक उभं करणं आमच्या पिढीला जमू शकत नाही. पण आजची मुलं कमी वेळेत हे करत आहेत. परंतु पुरेसा वेळ घेऊनच या गोष्टी केल्या पाहिजेत.
फोटो
- दीप्ती कानविंदे,
अभिनेत्री, निवेदिका.

महिला कलाकारांची संख्या वाढती
रंगमंचासह विविध माध्यमांत वावर
शिबिरांचा चांगलाच उपयोग
घरातून आई-वडिलांचा पाठिंबा
उपजत ज्ञानही आवश्यक