रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा
रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

-rat२६p६.jpg-
९१४५३
रत्नागिरी : हिंदु नववर्ष स्वागतयात्रेत सहभागी संस्कृतप्रेमी मंडळी.
-
नववर्ष स्वागतयात्रेत संस्कृतप्रेमींचा उत्साहपूर्ण सहभाग

रत्नागिरी : हिंदू नववर्ष, गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित नववर्ष स्वागत यात्रेत रत्नागिरीमधील संस्कृत प्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. संस्कृत भारती आणि भारतरत्न महामहोपाध्याय डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र यांच्या नेतृत्वात स्वागतयात्रेत संस्कृतप्रेमी सहभागी झाले. गेली अठरा वर्षे रत्नागिरीमध्ये या स्वागत यात्रेचे आयोजन होत आहे. परंतु संस्कृत प्रेमींच्या समूहाचा हा प्रथमच समावेश यावर्षी यात्रेत झाला. संस्कृतभारतम्, समर्थभारतम्, जयतु संस्कृतम्, विश्वपोषकम् असे फलक घेऊन आणि घोषणा देऊन सर्वांनी उत्साह दाखवला. भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राचे प्रमुख डॉ. दिनकर मराठे आणि संस्कृत भारती कोकण प्रांताच्या उपाध्यक्षा डॉ. प्रा. कल्पना आठल्ये आणि दक्षिण रत्नागिरी जिल्हा संयोजिका अक्षया भागवत यांच्या नेतृत्वात संस्कृतप्रेमी मंडळी एकत्र आली होती. दरवर्षी स्वागतयात्रेत सहभाग घेण्याचे या वेळी ठरवण्यात आले.
-

शिर्के प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचे ३० एप्रिलला स्नेहसंमेलन

रत्नागिरी : रा. भा. शिर्के प्रशालेच्या २००० सालातील बॅचचे स्नेहसंमेलन ३० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले आहे. शिर्के प्रशालेत हे स्नेहसंमेलन साजरे होणार असून, मुख्य कार्यक्रम रंजन मंदिरमध्ये होणार आहे. ३० एप्रिलला सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्नेहसंमेलन रंगणार आहे. सकाळी विद्यार्थ्यांचे वाजत-गाजत स्वागत होणार आहे. २३ वर्षांपूर्वी शाळेचा दिनक्रम होता, तशीच शाळा भरणार आहे. साडेअकरा वाजता रंजन मंदिरमध्ये प्रार्थना होईल. त्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मनोगते व्यक्त करतील. दुपारी एक वाजता मधली सुट्टी होईल व स्नेहभोजन होईल. दुपारी तीन वाजता रंजन मंदिर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम माजी विद्यार्थी सादर करणार आहेत. डिसेंबरमध्ये होणाऱ्या रा. भा. शिर्के प्रशालेच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचे नियोजन होणार आहे. शिर्के प्रशालेच्या २००० सालातील बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
-
चांदेराईमध्ये वैश्य समाजातर्फे विविध कार्यक्रम
रत्नागिरी : चांदेराई वैश्य समाजाच्या वतीने गुढीपाडवा व नववर्षानिमित्त चांदेराईत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहाटे श्री देव चव्हाटा येथे शिमग्याच्या दिवशी उभी केलेली होळी मानकरी व गावकरी यांच्या उपस्थित तोडण्यात आली. सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर श्री देव शंकराच्या मंदिरातून वसंत पूजा आणली. दत्त प्रसादिक मंडळाकडून पती सगळे उचापती या नाटकाचा प्रयोग सादर केला. या कार्यक्रमांना सुमारे ७०-८० वर्षांची परंपरा आहे. पूर्वीच्या काळात विद्युत यंत्रणा नव्हती म्हणून त्या वेळेपासून सुरू असणारी दिवटी आजही पाजळण्यात येते. नाटक सुरू होण्याआधी मंगलाचरण सादर केले. त्यात देवाचे स्तवन केले जाते. विदूषक, देव गणपती व देवी सरस्वती येऊन आशीर्वाद देतात. अशी ऐतिहासिक परंपरा आजही जपली.