-कासवांची 81 पिल्ले झेपावली सागरात

-कासवांची 81 पिल्ले झेपावली सागरात

फोटो ओळी
-rat२६p११.jpg -
९१४६५
आंजर्ले : कासवांची समुद्रात झेपावणारी पिल्ले
-rat२६p१४.jpg - ः
९१४६८
आंजर्ले समुद्र किनारी अश्या प्रकारे कासवांची घरटी संरक्षित केलेली आहेत.
-rat२६p१२.jpg-
९१४६६
आंजर्ले येथे कासव महोत्सव असल्याने कासवाची पिल्ले समुद्रात झेपावताना पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती.
-rat२६p१५.jpg -
९१४६९
कासवाची पिल्ले समुद्रात सोडताना.
-

कासवांची ९७ पिल्ले झेपावली सागरात

आंजर्लेत पर्यटक खुष ; तीन हजाराहून अधिक अंडयांचे २७ घरटयांत संवर्धन
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ/हर्णै, ता. २६ : दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी संरक्षित करण्यात आलेल्या घरट्यामधून बाहेर आलेली कासवांची ९७ पिल्ले काल (ता.२५) आंजर्ले समुद्रात झेपावली. कासवांची पिल्ले समुद्राकडे झेपावतानाचे हे दृष्य पाहण्यासाठी स्थानिकासह आंजर्ले येथे पर्यटनासाठी आलेले पर्यटकही हजर होते. या नयनरम्य सोहळयाचा साऱ्यानी सकाळी सकाळीच अगदी मनमुराद आनंद घेतला. आंजर्लेत पर्यटनासाठी आल्याचा पर्यटकांचा उद्देश चांगलाच सफल झाला.
कडयावरच्या गणपतीचे सुप्रसिध्द ठिकाण असलेल्या दापोली तालूक्यातील आंजर्ले गावाला निसर्गतःच वरदान लाभले आहे. अशा या आंजर्लेच्या निसर्गरम्य आणि शांत समुद्रकिना-यावर थंडीच्या शेवटी अन् उन्हाळयात ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे अंडी घालण्यासाठी येतात. कासवांचे आणि कासवांनी घातलेल्या अंडयांचे संरक्षण होण्यासाठी वन विभागाच्या सहाय्याने स्थानिक कासव मित्रांच्या सहकार्याने आंजर्ले समुद्र किना-यावर तब्बल ३ हजार १६८ अंडयांचे २७ घरटयांमध्ये संवर्धन करण्यात आले आहे. संवर्धन केलेल्या घरटयांमधून काल सकाळी ८१ तर आज सकाळी १६ कासवांची पिल्ले समुद्राकडे झेपावली. आंजर्लेत पर्यटनासाठी आल्याने निसर्गाची विविधताही त्याना न्याहाळता आली.
आंजर्लेत कासवांची अंडी संरक्षित करण्याचे काम दापोलीचे वन परिक्षेत्र अधिकारी वैभव बोराटे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दापोली तालूका वनाधिकारी साताप्पा सावंत, कोंगळेच्या वनरक्षक शुभांगी गुरव आदींच्या सहकार्याने तृशांत भाटकर, अभिनय केळसकर, संदेश देवकर, सुयोग मयेकर आणि प्रथमेश केळसकर या कासवमित्रांनी यशस्वी केले आहे. ३० मार्च पर्यंत कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अंड्यातून कासवांची पिल्ले बाहेर येण्याचा कालावधी सुरू झाल्याने याच काळात तेथील स्थानिकांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
-
कोट
समुद्री कासवांचे संवर्धन व संरक्षण करणे ही आंम्हाला निसर्गाने दिलेली एक संधी आहे. त्यामुळे कासव संवर्धन आणि संरक्षणाचे हे ईश्वरी कार्य आहे असे समजून आंम्ही ते काम करत आहोत. निसर्गाचा समतोल राखून सर्वांनी जीवन जगावे हाच संदेश देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे.
-तृशांत भाटकर, कासव मित्र, आंजर्ले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com