पुढील वर्ष ''महाविकास''चेच

पुढील वर्ष ''महाविकास''चेच

91446
कुडाळ ः आमदार वैभव नाईक यांना उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे वाढदिवसानिमित्त गदा भेट देण्यात आली. यावेळी संजय पडते, गौरीशंकर खोत, सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे आदी.

पुढील वर्ष ‘महाविकास’चेच

कुडाळमध्ये सूर; आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी

कुडाळ, ता. २६ ः राज्यात २०२४ हे विधानसभा निवडणुकीचे वर्ष महाविकास आघाडीचे असणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रिपद निष्ठेचे पाईक असणारे आमदार वैभव नाईक यांनाच मिळेल, असा विश्वास उपस्थित महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला. आमदार नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत वाढदिवस दिमाखात साजरा करण्यात आला.
कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ तालुका उद्धव ठाकरे शिवसेनेच्यावतीने काल (ता. २५) रात्री येथील क्रीडा संकुल (तहसीलदार कार्यालयानजीकचे मैदान) येथे शिमगोत्सव (रोंबाट) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ शिवसैनिक भास्कर गावडे यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, सहसंपर्क प्रमुख गौरीशंकर खोत, सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, प्रकाश जैतापकर, अभय शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक सचिव काका कुडाळकर, प्रसाद रेगे, नगराध्यक्ष आफ्रीन करोल, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, उपनगराध्यक्ष तथा युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, माजी उपसभापती जयभारत पालव, बाळा कोरगावकर, सचिन कदम, अतुल बंगे, विकास कुडाळकर, उदय मांजरेकर, किरण शिंदे, संतोष शिरसाट, सई काळप, श्रेया गवंडे, ज्योती जळवी, श्रुती वर्दम, श्रेया परब, सुनील भोगटे, अक्षता खटावकर, स्नेहा दळवी, गंगाराम सडवेलकर, सचिन काळप, शेखर गावडे, कृष्णा धुरी, गुरुनाथ गडकर, सचिन कदम, संजय करलकर आदी उपस्थित होते.
अतुल रावराणे म्हणाले, ‘‘आमदार नाईक हे शिवसेनेसह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वैभव आहेत. त्यांना पालकमंत्री, कॅबिनेट मंत्री झालेले बघायचे आहे. आजच्या कार्यक्रमातील गर्दी त्यांच्या कामाची पोचपावती आहे. त्यांनी दहशतवाद संपवून विकासाची गंगा जिल्ह्यात आणली. चौकशी सुरू असतानाही न डगमगता उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ते ठाम आहेत, हीच त्यांची निष्ठा आहे. पर्यटन जिल्ह्याच्या संस्कृतीचा वारसा जोपासण्याचे काम कौतुकास्पद आहे.’’ अमित सामंत म्हणाले, ‘‘सहा महिने राज्याच्या राजकारणात विविध घटना सुरू असताना जनतेच्या रोषाला खासदार, आमदारांना सामोरे जावे लागत आहे; पण आमदार नाईक यांनी अभिमानास्पद कामगिरी करत जनतेचे हित सांभाळले. या त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांना पुढील वर्षी लाल दिव्याची गाडी निश्चितच मिळेल.’’ दरम्यान, डॉ. संजय निगुडकर यांची कन्या डॉ. जुई ही पीजी नीट परीक्षेत देशात सातवी आल्याबद्दल तिचा आमदार नाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हा सन्मान तिच्या आई-वडिलांनी स्वीकारला.
--
जिल्ह्याला राज्यभरात ओळख
सतीश सावंत म्हणाले की, ‘‘आमदार नाईक यांनी निष्ठावंतपणाने जिल्ह्याला महाराष्ट्रात वेगळी ओळख मिळवून दिली. शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न विधानसभेत मांडले. या मतदारसंघात सर्वाधिक निधी आणला. जिल्ह्यातील शिमगोत्सवातील लोककला जतन करण्याचे काम या कार्यक्रमातून केले आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com