खारवी पतसंस्थेच्या दीप्ती कोळथरकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारवी पतसंस्थेच्या दीप्ती कोळथरकर
खारवी पतसंस्थेच्या दीप्ती कोळथरकर

खारवी पतसंस्थेच्या दीप्ती कोळथरकर

sakal_logo
By

-rat२६p९.jpg-
९१४५६
नाशिक : खारवी नागरी सहकार पतसंस्थेच्या संचालिका दीप्ती कोळथरकर यांना सर्वोत्कृष्ट संचालिका पुरस्कार देताना केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार. सोबत आशा शेलार, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, रूपाली चाकणकर आदी.
-
दीप्ती कोळथरकरांना सर्वोत्कृष्ट संचालक पुरस्कार

रत्नागिरी, ता. २६ : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका दीप्ती कोळथरकर यांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या सर्वोत्कृष्ट संचालिका सक्षम सहकार, सक्षम महिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सक्षम सहकार, सक्षम महिला पुरस्कार पतसंस्था विश्वातील विविध पदांवर काम करणाऱ्या महिलांकरिता पुरस्कारांचे वितरण नुकतेच नाशिक येथे करण्यात आले. अल्पावधीतच सहकार क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेली खारवी पतसंस्थेच्या संचालिका दीप्ती कोळथरकर यांना सन्मानित केले. या वेळी मंचावर अभिनेत्री आशाताई शेलार, नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे, नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या उपस्थित होत्या.
कोळथरकर अंगणवाडी सेविका म्हणून २२ वर्षे सेवा करत आहेत. सरस्वती महिला मंडळाच्या १० वर्ष सचिव आहेत. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प दाभोळ मास्टर ट्रेनर २ वर्ष, सहकार क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत आहेत. महिला बचत गटांना १९९५ पासून मार्गदर्शन करत आहेत. आध्यात्मिक स्वाध्याय परिवार केंद्राच्या २० वर्ष संचालक आणि बालसंस्कार केंद्राच्या १५ वर्ष संचालक आहेत.