‘पंचक्रोशी फोंडा’ कबड्डी स्पर्धेत विजेता

‘पंचक्रोशी फोंडा’ कबड्डी स्पर्धेत विजेता

91441
कुडाळ : जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील विजेत्या पंचक्रोशी फोंडा संघाला गौरविताना पदाधिकारी.


‘पंचक्रोशी फोंडा’ कबड्डी स्पर्धेत विजेता

कुडाळमधील ‘आमदार चषक’; ‘यंगस्टार कणकवली’ उपविजेता, २० संघांचा सहभाग

कुडाळ, ता. २६ ः आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त येथे झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पंचक्रोशी फोंडा संघ ‘आमदार वैभव नाईक’ चषकाचा मानकरी ठरला. सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने व कुडाळ तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने युवक कल्याण संघ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यावतीने आमदार चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा नुकतीच येथील क्रीडा संकुल (तहसीलदार कार्यालय नजीकचे मैदान) येथे झाली.
शुक्रवारी (ता. २४) रात्री या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा झाला. उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी या स्पर्धेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार नाईक यांच्यासह जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, जिल्हा परिषद माजी गटनेते नागेंद्र परब, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, उपनगराध्यक्ष तथा युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, माजी उपसभापती जयभारत पालव, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, अतुल बंगे, नगरसेवक उदय मांजरेकर, किरण शिंदे, संतोष शिरसाट, नगरसेविका सई काळप, श्रेया गवंडे, महिला आघाडी विधानसभा संघटक श्रेया परब, विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, शेखर गावडे, सचिन काळप, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, शहरप्रमुख राजू गवंडे आदी उपस्थित होते. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धा निरीक्षक म्हणून मार्टीन अल्मेडा व पंचप्रमुख म्हणून राजेश सिंगनाथ यांनी काम पाहिले. पंच म्हणून किशोर पाताडे, प्रीतम वालावलकर, सीताराम रेडकर, सी. ए. नाईक, वैभव कोंडसकर, सागर पांगुळ, अमित गंगावणे, जयेश परब, प्रथमेश सावंत, प्रथमेश नाईक, मधुकर पाटील यांनी काम पाहिले.
--
२० संघांचा सहभाग
दोन दिवसांच्या स्पर्धेत जिल्ह्यातील २० संघ सहभागी झाले. स्पर्धेत द्वितीय क्रमांक यंगस्टार कणकवली, तृतीय क्रमांक शिवभवानी सावंतवाडी व चतुर्थ क्रमांक लक्ष्मीनारायण वालावल संघाने मिळविला. सर्वोकृष्ट खेळाडू म्हणून अक्षय पाटील, उत्कृष्ट पकड-गौरव राणे व उत्कृष्ट चढाई-प्रथमेश पेडणेकर यांची निवड करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com