चिपळूण-संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-संक्षिप्त पट्टा
चिपळूण-संक्षिप्त पट्टा

चिपळूण-संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

rat2630.txt

बातमी क्र. 30 (टुडे पान 2 साठी, संक्षिप्त)

फोटो ओळी
-rat26p21.jpg-
चिपळूण ः प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालयातील चौथीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला भेटवस्तू दिली.
--------------

आसर विद्यालयात चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप
चिपळूण ः प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालयात चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात झाला. अशोक मिसाळ यांनी प्रास्ताविक केले. आदित्य कांबळेने इंग्रजीतून मनोगत व्यक्त करताना त्याने इंग्लिश पेटंट व सेमीचा उपयोग कसा करून घेतला हे सांगितले. शिक्षिका शर्मिला मोडक यांनी कोरोना काळानंतर शिक्षकांसमोर प्रश्नचिन्ह होते. परंतु विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले. मुख्याध्यापिका श्रीमती संगीता नाईक यांनी अभ्यासातील सातत्यासोबतच नियमित व्यायाम, योगा, खेळ यांचे महत्त्व सांगून सकस आहार आणि सकारात्मक विचारांची जोड देऊन नवनवीन ज्ञान अवगत करून स्वतःचा विकास साधा. मोबाईलचा वापर केवळ अभ्यासासाठी मर्यादित स्वरूपाचा ठेवा, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी शाळेला विविध भेटवस्तू देऊन शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शालेय समिती अध्यक्षा वैशाली निमकर यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
......................

फोटो ओळी
-rat26p22.jpg- नितीन ठसाळे
-------------

नितीन ठसाळेंचा ‘सह्याद्री रत्न’ पुरस्काराने गौरव
चिपळूण ः सह्याद्री कुणबी संघातर्फे नितीन ठसाळे यांना ‘सह्याद्री रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. सह्याद्री कुणबी संघाच्या वर्धापन दिनानिमित्ताने चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते नितीन ठसाळे यांची राजकीय कारकीर्द, सामाजिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाची दखल घेऊन त्यांना पुणे येथील सह्याद्री कुणबी संघातर्फे महाराष्ट्र प्रांत कार्याध्यक्ष गणपत दादा घडशी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विलास घडशी, सह्याद्री कुणबी संघाचे शहराध्यक्ष सतीश डाकवे, महिला आघाडी अध्यक्षा अंकिता शिगवण आदी उपस्थित होते.
............................

फोटो ओळी
-rat26p23.jpg- साखरपा : शिक्षण परिषदेत मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक दिलीप वाळके.
----------

साखरपा केंद्र शाळेची दहावी शिक्षण परिषद उत्साहात
साखरपा ः साखरपा नं. १ या केंद्र शाळेची दहावी शिक्षण परिषद केंद्रातील मेढेतर्फे देवळे शाळेत झाली. ‘अखंड ज्ञानसाधना आणि ज्ञानार्जन करून शिक्षक समाजाला दिशा देण्याचे काम करतात,’ असे गौरवोद्गार सरपंच प्रियंका जोयशी यांनी काढले. शिक्षण परिषदेत शिक्षक व्यावसायिक विकासाची गरज व विषयज्ञान विकासाचे महत्त्व, अध्यापन पद्धती आणि अध्यापनशास्त्राच्या ज्ञानाची आवश्यकता, बदलत्या शैक्षणिक साधनांची गरज, शिक्षकांची विद्यार्थ्यांबद्दलची बांधिलकी आणि व्यावसायिक विकासाची परिपक्वता गरज या विषयांवर चर्चा झाली. शिक्षण परिषदेला कोंडगावच्या सरपंच प्रियंका जोयशी, उपसरपंच दीप्ती गांधी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा रंजना आग्रे, केंद्रीय प्रमुख सहदेव पाटील, माजी केंद्रीय प्रमुख रामचंद्र कुवळेकर उपस्थित होते. मुख्याध्यापक दिलीप वाळके आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि ग्रामस्थांनी ही परिषद यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.
.................

..