दसूर शाळेला चिल्ड्रन हार्ट फाउंडेशनने दिला लॅपटॉप

दसूर शाळेला चिल्ड्रन हार्ट फाउंडेशनने दिला लॅपटॉप

फोटो ओळी
-rat२६p२५.jpg-
९१४९२
राजापूर ः चिखले शाळेला लॅपटॉप भेट देताना चिल्ड्रन्स हार्ट फाउंडेशनचे पदाधिकारी, कर्मचारी.
--
दसूर शाळेला चिल्ड्रन हार्ट फाउंडेशनने दिला लॅपटॉप

राजापूर, ता. २५ ः तालुक्यातील दसूर-चिखले येथील जिल्हा परिषद शाळा चिखलेला विरार-मुंबई येथील चिल्ड्रन्स हार्ट फाउंडेशन आणि त्यांच्या कर्मचाऱ्‍यांनी सामाजिक बांधिलकीतून लॅपटॉप भेट दिला.
संस्थेचे ट्रस्टी अमरीन पेंटर, ब्रांच मॅनेजर राकेश नेमन, मॅनेजर श्वेता नेमन, सहकारी शांताराम मोरे, शीतल मोरे आदींनी चिखले शाळेला नुकताच लॅपटॉप भेट दिला. फारशा आवश्यक असलेल्या विविधांगी सुविधा उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी सध्याच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण घेण्यापासून काहीसे वंचित राहत असल्याचे चित्र दिसते. मात्र, आधुनिक युगामध्ये विद्यार्थ्यांना स्वतःची प्रगती करून पुढे जाण्यासाठी शालेय स्तरामध्ये संगणकीय शिक्षण मिळणे गरजेचे आहे. ही बाब ओळखून मुंबईस्थित प्रवीण पांडुरंग तांबे यांनी चिखले शाळेला लॅपटॉप भेट द्यावी अशी मागणी विरार-मुंबई येथील चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशनकडे केली होती. त्यानुसार ही मागणी पूर्ण करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com