ताम्हाणेतील विकासकामांसाठी सव्वाकोटी मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ताम्हाणेतील विकासकामांसाठी सव्वाकोटी मंजूर
ताम्हाणेतील विकासकामांसाठी सव्वाकोटी मंजूर

ताम्हाणेतील विकासकामांसाठी सव्वाकोटी मंजूर

sakal_logo
By

-rat२६p२६.jpg-
९१४९३
राजापूर ः टाकीच्या बांधकामाची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा करताना आमदार राजन साळवी.
--

ताम्हाणेतील विकासकामांसाठी सव्वाकोटी मंजूर

राजापूर, ता. २६ ः शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांच्या माध्यमातून तालुक्यातील ताम्हाणे गावातील रस्ता, नळपाणीपुरवठा योजना आणि हायस्कूल येथे हॉल बांधणे आदी विकासकामांसाठी विविध योजनांमधून सुमारे १ कोटी २५ लाखाचा निधी मंजूर झाला आहे.
या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख कमलाकर कदम, महिला उपजिल्हा संघटिका दूर्वा तावडे, तालुका युवाधिकारी संदेश मिठारी, पाचले विभागप्रमुख गणेश तावडे, महिला विभागप्रमुख अंजली कडू, उपविभागप्रमुख अनंत बेर्डे, विभाग युवाधिकारी संदीप बारस्कर, ताम्हाणे सरपंच समिक्षा वाफेलकर आदी उपस्थित होते.
जलजीवन मिशन अंतर्गत सौंदळकरवाडी येथे नळपाणी पुरवठा योजना करण्यासाठी ७७ लाख, बोल्ये दुकान ते पहिली वाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी ३८ लाख, ताम्हाणे हायस्कूल येथे हॉल बांधण्यासाठी १० लाख रुपये मंजूर झाले आहेत. या कामांचे भूमिपूजन आमदार साळवी यांच्या हस्ते झाले.