
खासदार राऊत आज जिल्ह्यात
91495
खासदार राऊत आज जिल्ह्यात
कुडाळ ः खासदार विनायक राऊत उद्या (ता. २७ ) सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा असा ः सकाळी साडेदहाला जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओरोस नं. १ येथे संगणक वितरण कार्यक्रमास उपस्थिती (ता. कुडाळ), साडेअकराला महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२२ उद्घाटनास उपस्थिती, सायंकाळी साडेपाचला कुडाळ उपनगराध्यक्ष तथा युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या वाढदिवस कार्यक्रमास कुडाळ येथे उपस्थिती, रात्री आठला मांगेली-देऊळवाडी (ता. दोडामार्ग) येथे चिदंबर मंदिर वर्धापन दिनास उपस्थिती.
...............
देवगड किनारी उकाड्यात वाढ
देवगड : तालुक्याच्या किनारपट्टी भागात उकाड्यात वाढ झाली आहे. दिवसा कडक उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्यावेळी रस्त्यावरील वर्दळ मंदावलेली असते. वाढत्या उकाड्यापासून सुरक्षितता मिळवण्यासाठी रसवंतीगृह, थंडपेय यांना प्रतिसाद मिळू लागला आहे. शाळाही सकाळच्या सत्रात असल्याने दुपारी बाजारातील रहदारी मर्यादित असते. अचानक उष्णता वाढू लागल्याने पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.