सिंधुदुर्ग क्रिकेट संघाची ''सुपर लीग''मध्ये धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्ग क्रिकेट संघाची ''सुपर लीग''मध्ये धडक
सिंधुदुर्ग क्रिकेट संघाची ''सुपर लीग''मध्ये धडक

सिंधुदुर्ग क्रिकेट संघाची ''सुपर लीग''मध्ये धडक

sakal_logo
By

91527
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग क्रिकेट संघाला जर्सी प्रदान प्रसंगी अमेय प्रभूतेंडुलकर, बाळ चोडणकर आदी.

सिंधुदुर्ग क्रिकेट संघाची
‘सुपर लीग’मध्ये धडक
सावंतवाडी ः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित निमंत्रितांच्या खुल्या गटाच्या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघाने नेत्रदीपक कामगिरी करत ‘फ’ गटामध्ये अव्वल स्थान पटकावले असून स्पर्धेच्या सुपर लीग सामन्यांसाठी पात्र ठरला. या संघातील खेळाडूंना मे. लक्ष्मीनारायण शिपिंग सिंधुदुर्गचे मालक व युवा उद्योजक अमेय प्रभूतेंडुलकर यांनी क्रिकेट जर्सी प्रदान केल्या. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष बाळ चोडणकर, संघ व्यवस्थापक रघुनाथ धारणकर, असोसिएशनचे माजी सचिव दिनेश कुबडे, लेखापरीक्षक सुधीर नाईक, शंकर नाईक, संघाचा कर्णधार सर्वेश सावंत, संघातील प्रमुख खेळाडू व किंग्स इलेव्हन पंजाबचा आयपीएल खेळाडू निखिल नाईक, महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील संघाचा खेळाडू प्रथमेश गावडे, मुंबई युनिव्हर्सिटीसाठी निवड झालेला श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा खेळाडू व कर्णधार राजाराम गवस, महेश डोंगरे आदी उपस्थित होते.
...............
91529
मालवण ः आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रामेश्वर मंदिरात लघुरुद्र करण्यात आले.

ठाकरे शिवसेनेतर्फे मालवणलघुरुद्र
मालवण, ता. २६ : आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त येथील उद्धव ठाकरे शिवसेनेच्यावतीने शहरातील देऊळवाडा रामेश्वर मंदिर येथे लघुरुद्र करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी शहरप्रमुख नंदू गवंडी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, महिला उपजिल्हा संघटक सेजल परब, शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार केणी, तपस्वी मयेकर, ज्योती मयेकर, नंदा सारंग, सन्मेष परब, उमेश मांजरेकर, आकांक्षा शिरपुटे, नीना मुंबरकर, मनोज मोंडकर, मोहन मराळ, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, बाबू वाघ, महेंद्र म्हाडगुत, हेमंत मोंडकर, किशोर गावकर, उमेश चव्हाण, दत्ता पोईपकर, नाना नाईक उपस्थित होते. यावेळी आमदार नाईक यांना चांगले आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, येणाऱ्या संकटांना मात करण्याची ताकद देवो, अशी प्रार्थना रामेश्वर चरणी करण्यात आली.