संक्षिप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप
संक्षिप

संक्षिप

sakal_logo
By

महामार्गाचे रखडलेल्या कामाला होणार सुरुवात

चिपळूण : जनआक्रोश समितीच्या आणि चिपळूणचे सुपुत्र ॲड. ओवेस पेचकर यांच्या न्यायालयीन लढ्याला यश आले असून मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी गुरुवारी (ता. ३०) सकाळी ९ वाजता केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी कोकणात येत आहेत. खारपाडा टोल नाका, पेण येथे या कामाचा आरंभ गडकरी करतील, अशी माहिती मुंबई-गोवा महामार्गा जनआक्रोश समितीचे अध्यक्ष श्रीधर तथा काका कदम यांनी शुक्रवारी दिली.
खासदार नितीन गडकरी ३० मार्चला येत असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्याचे काका कदम यांनी सांगितले. जनआक्रोश समितीच्या माध्यमातून अशाच प्रकारे समन्वयाची भूमिका घेऊन पळस्पे ते कासू आणि कासू ते इंदापूर, इंदापूर ते झारापपर्यंतच्या भागातील रखडलेले महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण करू घेऊ, असा विश्‍वासही काका कदम यांनी केला आहे.