जय सीमा माता कबड्डी संघ विजेता

जय सीमा माता कबड्डी संघ विजेता

फोटो ओळी
-rat२६p२८.jpg -
९१५३७
सालदुरे : विजेत्या संघास पारितोषिक प्रदान करताना मान्यवर.
-
जय सीमा माता कबड्डी संघ विजेता

दाभोळ : दापोली तालुक्यातील सालदुरे-वरचीवाडी येथे गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मॅटवरील तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सालदुरेच्या जय सीमा माता कबड्डी संघाने प्रतिस्पर्धी कर्देच्या श्रीराम कबड्डी संघावर ६ गुणांनी मात करत अंतिम विजेतेपद पटकावले. कर्दे येथील श्रीराम कबड्डी संघ उपविजेता ठरला. केळशीच्या महालक्ष्मी संघाला तृतीय आणि वणंदच्या शिवसाई संघाला चौथा क्रमांक मिळाला. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिक मान जय सीमा माता कबड्डी संघाच्या ओजस निलेश खेडेकर, तर उत्कृष्ट पकडीचे पारितोषिक साई शिंदे, उत्कृष्ठ चढाईपट्टूचे पारितोषिक ऋतिक पाते यांना देण्यात आले. बक्षीस समारंभाला अज्ञानी वरवडेकर, अश्विनी वरवडेकर, ज्ञानेश परमार, कीर्तीकुमार वेलदुरकर, संजय जोशी, माधव परचुरे, नीलेश भुवड, किशोर तेली, निलेश खेडेकर आदी उपस्थित होते.
-
जुन्या पेन्शनमुळे सरकारचा फायदा

रत्नागिरी : कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू केल्यानंतर सरकारच्या तिजोरावर भार पडत नाही, नुकसान होत नाही तर फायदाच होतो, हे पटवून देणारे परिगणना पत्रक बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केल्यावर सरकारच्या तिजोरीवर भार पडत नाही. प्रति कर्मचारी दरमहा सरासरी ४० हजार रुपये सुरवातीचे मूळ वेतन गृहीत धरुन वर्तमान एनपीएस योजनेनुसार २८ वर्षे सेवा कालावधीचे परिगणना पत्रक पाठवले आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांचे १० टक्के अंशदान व शासनाचे १४ टक्के अंशदान या रकमेची ६ टक्के व्याजदराचे १ वर्षाचे आरडी मूल्य व त्याची पुढील उरलेल्या सेवाकालावधीसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केवळ १० टक्के परतावा गृहीत धरला तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार मागील ७ वर्षात सरासरी ११ टक्के उत्पन्न मिळाले आहे. एकूण जमा रक्कम ३ कोटी ४७ लाख, ४८ हजार ५२ रुपये होते. यापैकी ४० टक्के रक्कम १ कोटी ३८ लाख ९९ हजार २२१ रुपये सेवानिवृत्तीवेळी कर्मचाऱ्यांना परत केल्यानंतरही पुढील म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी २ कोटी ८ लाख ४८ हजार ८३१ रुपये जमा राहतात. त्यानुसार ३ कोटी ७२ लाख ३० हजार ८११ रुपये सरकारच्या तिजोरीत भर पडते असे त्यानी आकडेवारीसह दाखवून दिले आहे.
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com