चिपळुणात कर वसुलीसाठी अंतिम मुदत

चिपळुणात कर वसुलीसाठी अंतिम मुदत

चिपळुणात कर वसुलीसाठी अंतिम मुदत

नगरपालिका ; आज न भरल्यास जप्तीची कारवाई

चिपळूण, ता. २६ : चालू व थकीत कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नगर पालिका प्रशासनाकडे अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे कर वसुली पथकांनी कारवाईची कडक पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहेत. असे असतानाच नागरिकांना अजूनही एक संधी देत मालमत्ता कर व पाणीपट्टीची रक्कम भरण्यासाठी २७ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या तारखेपर्यंत कराची सर्व रक्कम न भरल्यास जप्तीची कठोर कारवाई केली जाणार आहे. शनिवारपासून लाऊडस्पिकरव्दारे तशा प्रकारच्या सूचना शहरात दिल्या जाणार आहेत.
थकीत मालमत्ता कर व अन्य शासकीय करांसह ३ कोटी मालमत्ता कर व ८० लाख रूपयांची पाणीपट्टी वसुलीचे आव्हान प्रशासनासमोर आहे. यामुळे जप्तीची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. चालू व थकीत कर वसुलीसाठी नगर पालिकेमार्फत विविध फंडे अवलंबले जात आहेत. विशेष म्हणजे पालिकेतील प्रशासकीय अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी या कर वसुलीच्या कामात गुंतले आहेत. आर्थिक वर्ष संपत आल्याने आणि शासनाने कर वसुलीचा तगादा लावल्याने नगर पालिका प्रशासनासमोर वसुलीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. कर वसुलीसाठी सुमारे ३० पथके शहरात तैनात करण्यात आली आहे. पाच दिवसांनी आर्थिक वर्ष संपणार आहे. त्यामुळे प्रशासनाने कर वसुलीसाठी मालमत्ता जप्तीसह नळ कनेक्शन तोडण्याची जोरदार कारवाई सुरू केली आहे. प्रशासनाने घरपट्टी, पाणीपट्टीसह अन्य शासकीय कराची रक्कम भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांना शेवटची संधी दिली आहे. २७ मार्चपर्यंत चालू व थकीत कराची सर्व रक्कम भरा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा सूचना केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com