रत्नागिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी
रत्नागिरी

रत्नागिरी

sakal_logo
By

rat2625.txt

बातमी क्र. 25 (टुडे पान 2 साठी, संक्षिप्त)

गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात
रोजगार, स्वयंरोजगार मेळावा

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळावा नुकताच झाला. हा मेळावा महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स व प्लेसमेंट सेलच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत, व्होकेशनल एज्युकेशन अॅड ट्रेनिंगचे प्रा. शिवाजी उकरंडे आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख यांच्या उपस्थितीत उद्‍घाटन झाले. याप्रसंगी विविध प्रकारच्या १२ आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. १७० उमेदवारांनी यामध्ये सहभाग नोंदवला. शासनाच्या विविध महामंडळांच्या योजनांची माहिती घेतली आणि विविध नोकऱ्यांकरिता मुलाखतीही दिल्या. मुंबई. पुणे, कोल्हापूर, रत्नगिरी या ठिकाणच्या कंपन्यांमधून ४०० रोजगार उपलब्ध करून देण्यात आले. र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीशजी शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर तसेच प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
-----------