रंगपंचमीला हाणामारी
करणाऱ्या चौघांवर गुन्हा

रंगपंचमीला हाणामारी करणाऱ्या चौघांवर गुन्हा

रंगपंचमीला हाणामारी
करणाऱ्या चौघांवर गुन्हा
कणकवली,ता. २६ : येथे रंगपंचमी साजरी करत असतानाच मंगळवारी (ता.२१) शहरातील बांधकरवाडी येथे रंगपंचमीनंतर हाणामारीची घटना घडली. याप्रकरणी चौघा युवकांवर गुन्हा दाखल झाला. याबबात मनीष महेश सावंत (वय २२, रा. मधलीवाडी) यांनी येथील पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार कणकवली-बांधकरवाडी येथील प्रणय मर्गज, सुमीत राणे, रजत राणे, अनिकेत म्हाडेश्वर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादीत म्हटले आहे की, मनीष सावंत हा २१ मार्च रोजी रंगपंचमीदिवशी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आपल्या घराजवळ उभा होता. त्याचवेळी बांधकरवाडी येथील काही तरुण तेथे घोळका करून होते. मनीषने त्या तरुणांना ‘आपणास घरी जायचे आहे, वाटेतून बाजूला व्हा’, असे सांगितले. यावरून संशयितांनी मनीषला मारहाण केली. शिविगाळ करीत मनीषच्या मानेवर दांड्याने मारहाण केली. यावेळी मनीषची आई व काकी हाणामारी सोडवायला आली असता त्यांनाही धक्काबुक्की केली तसेच घरात घुसून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीनुसार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com