खेंड येथील न.प.च्या पाणी साठवण टाकीला गळती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेंड येथील न.प.च्या पाणी साठवण टाकीला गळती
खेंड येथील न.प.च्या पाणी साठवण टाकीला गळती

खेंड येथील न.प.च्या पाणी साठवण टाकीला गळती

sakal_logo
By

-rat२६p३१.jpg-
९१५५५
चिपळूण ः खेंड येथील पालिकेच्या पाणी साठवण टाकीची दुरवस्था झाली आहे.

खेंडमधील पाणी साठवण टाकीला गळती

स्ट्रक्चरल ऑडिट करा : शिवसेनेतर्फे पालिका प्रशासनाकडे मागणी

चिपळूण, ता. २६ः शहरातील खेंड येथील नगर पालिकेच्या जुन्या पाणी साठवण टाकीची दुरवस्था झाली आहे. या टाकीला गळती लागली असून पाणी वाया जात आहे. टाकीच्या बांधकामाच्या लोखंडी सळ्याही बाहेर पडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या टाकीचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करून डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख अंकुश आवले यांनी नगर पालिका प्रशासनाकडे निवेदनाव्दारे केली आहे.
नगर पालिकेकडून नळपाणी पुरवठा योजनेमार्फत संपूर्ण शहराला पाणी पुरवठा केला जातो. या योजनेंतर्गत खेंड विभागातील खेड विभागातील लोटणशहा दर्ग्याकडे जाणाऱ्या वाटेवर सन १९८५ रोजी पाणी साठवण टाकी उभारण्यात आली. ही टाकी ३८ वर्षे जुनी आहे. किमान ६ ते ७ लाख लिटर पाणी साठवणुकीची क्षमता या टाकीची आहे. या टाकीच्या आजुबाजूच्या परिसरात मोठी लोकवस्तीही आहे. सध्यस्थितीत या टाकीची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. शिडी मोडक्या अवस्थेत आहे. त्यामुळे टाकीची साफसफाई होत नसून अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याची शंका अंकुश आवले यांनी व्यक्त केली आहे. पाण्याची टाकीला गळती लागली असून टाकीच्या सभोवतालचे प्लास्टर निघाले आहे. टाकीच्या शिगासुध्दा बाहेर दिसून येत आहेत. गळतीमुळे पाणी वाया जात आहे. टाकीच्या खालच्या बाजूस लोकवस्ती आहे. तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून टाकीचे स्ट्रॅक्चरल ऑडिट लवकरात लवकर पूर्ण करून टाकी बांधकामकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख अंकुश आवले यांनी नगर पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.