अंगणवाडी सेविकेसह मदतनिसांची १४ पदे भरणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंगणवाडी सेविकेसह मदतनिसांची १४ पदे भरणार
अंगणवाडी सेविकेसह मदतनिसांची १४ पदे भरणार

अंगणवाडी सेविकेसह मदतनिसांची १४ पदे भरणार

sakal_logo
By

rat२६३९.txt

बातमी क्र. ३९ (पान ५ साठी)

अंगणवाडी सेविकेसह मदतनिसांची १४ पदे भरणार

रत्नागिरी तालुका ः अर्जासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत

रत्नागिरी, ता. २६ ः एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी २ अंतर्गत एक अंगणवाडी सेविका व १३ अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे भरावयाची आहेत. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ३१ मार्चपर्यंत सायंकाळी ५ पर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या कार्यालयात अर्ज करावेत.
अंगणवाडी केंद्र करबुडे-खापरेकोंड या केंद्रामध्ये अंगणवाडी सेविका ही पदे भरावयाची आहेत. अंगणवाडी केंद्र करबुडे रामगडेवाडी, करबुडे मोहितेवाडी, करबुडे मूळगाव, तरवळ कुळ्येवाडी, आगरनरळ भोईवाडी, खालगाव शिंदेवाडी, मालगुंड बौद्धवाडी, निवेंडी वरचीवाडी, वरवडे खारवीवाडा क्र. १, चाफे वरचीवाडी, कोतवडे मुस्लिमवाडी, आरे, खरवते या १३ केंद्रांवर अंगणवाडी मदतनीस ही पदे भरावयाची आहेत. अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस पदासाठी १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा किमान १८ व कमाल ३५ वर्षे अशी राहील. आवश्यक माहितीसाठी सुट्टीचा दिवस वगळून इतर कार्यालयीन दिवशी सकाळी ९.४५ ते सांयकाळी ६.१५ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प रत्नागिरी २ यांनी केले आहे. नमुन्यातील परिपूर्ण अर्ज स्वीकारले जातील. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही व अपूर्ण अर्जाबाबत पत्रव्यवहार केला जाणार नाही.
....

चौकट

या आहेत अटी
विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा कमाल ४० वर्षे राहील. विधवा किंवा अनाथ असल्याबाबत दाखला, उमेदवारास जास्तीत जास्त दोन हयात अपत्ये व जातीचा दाखला आवश्यक आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी २ वर्षांचा अनुभव दाखला आवश्यक आहे. संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र आवश्यक आहे.