बेकायदा मासेमारीविरोधात कोस्टगार्डची मदत 
बेकायदा मासेमारीविरोधात कोस्टगार्डची मदत

बेकायदा मासेमारीविरोधात कोस्टगार्डची मदत बेकायदा मासेमारीविरोधात कोस्टगार्डची मदत

rat२६३६.TXT

बातमी क्र. ३६ (पान ५ साठी)

बेकायदा मासेमारीविरोधात कोस्टगार्डची मदत घ्या

मच्छीमारांनी केली होती मागणी ः कर्नाटकच्या घुसखोर बोटी

रत्नागिरी, ता. २६ ः अनधिकृत मासेमारीवर नियंत्रणासाठी कोस्टगार्डची मदत घ्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केली होती. त्याची मत्स्य खात्याने दखल घेतली असून, बेकायदा मासेमारी करणाऱ्या एलईडी व पर्ससीनसह कर्नाटकच्या घुसखोर बोटींवर कारवाईसाठी सहकार्य करावे, असे पत्र मागितले आहे.
अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल, कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो, सचिव संजय कोळी, सिंधुदुर्ग अध्यक्ष मिथुन मालंडकर, रत्नागिरी अध्यक्ष खलील वस्ता व इतर पदाधिकाऱ्यांनी कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार बंदरांचा दौरा केला होता. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर या सर्व जिल्ह्यांमध्ये पर्ससीन व एलईडी पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बोटींना डिसेंबर ते मे महिन्यात बंदी असताना १२ नॅाटीकलच्या आतील क्षेत्रात ते बेकायदेशीर मासेमारी करतात. सर्व जिल्ह्यांमध्ये पर्ससीन व एलईडी पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बोटींना जानेवारी ते मे महिन्यात बंदी असताना १२ नॉटिकल अंतराच्या आतील क्षेत्रात ते बेकायदेशीर मासेमारी करत होते. त्यामुळे शाश्वत मच्छिमारांना मच्छी मिळणे दुरापास्त झाले आहे. इतकेच नव्हे तर बेकायदा मासेमारी करणारे हे बोटवाले स्थानिक छोट्या व पारंपरिक मच्छीमारांना दादागिरी करून मासेमारी करण्यास मज्जाव करीत आहेत. शिवाय कर्नाटक राज्यातील मोठमोठ्या बोटी घोळक्याने महाराष्ट्राच्या हद्दीत येऊन बेकायदा मासेमारी करतात. त्याबाबतच्या तक्रारी कृती समितीने मत्स्य व्यवसाय विभागाकडे केली होती. त्यानंतर काही प्रमाणात कारवाईला सुरुवात झाली. मत्स्य विभागाकडे कारवाई करण्यास पुरेशी यंत्रणा नसल्याने अडचण होत असल्याचे सांगण्यात येत होते. कृती समितीने अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण करण्यासाठी कोस्टगार्डची मदत घेऊन कारवाई करा, अशी मागणी केली होती. त्यानुसार आयुक्तस्तरावरून कोस्टगार्डला लेखी पत्र दिले आहे.
...................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com