
देवेंद्र देवरुखकर यांना ‘शिक्षण रत्न’ पुरस्कार
९१५६४
मुंबई ः देवेंद्र देवरुखकर यांना ‘शिक्षण रत्न’ पुरस्काराने गौरविताना आमदार राजेश पाटील, महापौर प्रवीणा ठाकूर आदी.
देवेंद्र देवरुखकर यांना
‘शिक्षण रत्न’ पुरस्कार
तळेरे : भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान वाडा, पालघरमार्फत कणकवली तालुक्यातील कासार्डे ज्युनियर कॉलेजचे प्रा. देवेंद्र देवरुखकर यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक तसेच कोरोना काळात केलेल्या विशेष कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय ‘शिक्षण रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्याला महापौर प्रवीणा ठाकूर, आमदार राजेश पाटील, चर्मकार महासंघाचे अध्यक्ष अॅड. राजाराम मुकणे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश भोईर यांच्यासह सागर देशमुख, किरण थोरात, नगरसेवक सदानंद पाटील, डॉ. ऋतुजा भोसले आदी मान्यवरांसह देवरुखकर यांच्या पत्नी सरिता देवरुखकर व मुलगा अभिजित आदी उपस्थित होते. हा पुरस्कार वितरण सोहळा विरार मुंबई येथे वर्तक सभागृहात पार पडला. या पुरस्कारबद्दल देवरुखकर यांचे कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे सर्व पदाधिकारी, कासार्डे प्रशालेचे प्राचार्य एम. डी. खाड्ये, पर्यवेक्षक एन. सी. कुचेकर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
................
९१५६५
ठाणे ः श्री सोमेश्वर कलामंच संस्थेला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
‘श्री सोमेश्वर कलामंच’ला पुरस्कार
तळेरे : ठाणे येथील प्रेरणा फाउंडेशनचा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट सामाजिक जनजागृती पुरस्कार जिल्ह्यातील आडेली येथील श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्थेला देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम कल्याण येथील आचार्य अत्रे नाट्यगृहात झाला. याबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. श्री सोमेश्वर कलामंच संस्थेकडून ‘गराजलो रे गराजलो’, या मोहिमेद्वारे कोकणात जनजागृती केली जात आहे. त्यासाठी मोठी चळवळ उभारली जात आहे. रंगमंचावर व्यावसायिक नाटक आणि संपूर्ण कोकणातील विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या मुलाखतीद्वारे जनजागृती केली जात आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणातील विविध समस्यांचा आढावा घेऊन सामाजिक प्रश्नांबाबत जनजागृती केली जात आहे. या पुरस्काराबद्दल प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्रेरणा गावकर- कुलकर्णी यांचे श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्थेतर्फे आभार व्यक्त करण्यात आले.
---
91586
सावंतवाडी ः तहसीलदार अरुण उंडे यांना निवेदन देताना ‘सिंधू रक्तमित्र’चे पदाधिकारी.
‘रक्तपुरवठ्याचे शुल्क कमी करा’
सावंतवाडी ः सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सावंतवाडीच्या कार्यकारिणीमार्फत राष्ट्रीय रक्तधोरण व्यवस्थापनांतर्गत रक्त व रक्तघटक पुरवठा यासाठी आकारण्यात येणारे वाढीव शुल्क कमी करण्याबाबत आज येथील तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जिल्हा कार्यकारिणी सदस्य एकनाथ चव्हाण व सावंतवाडी तालुका खजिनदार सिद्धार्थ पराडकर यांनी हे निवेदन सादर केले.
--
मंत्री दीपक केसरकर आज सावंतवाडीत
सिंधुदुर्गनगरी ः शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे उद्या (ता.२७) सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा असा ः उद्या (ता.२७) दुपारी एकला गोवा येथून मोटारीने सावंतवाडीकडे प्रयाण. दुपारी दोनला कॉटेज हॉस्पीटलला भेट. दुपारी सव्वादोनला सावंतवाडी पालिकेच्या गाळेधारकांच्या तात्पुरत्या स्थलांतरीत जागेची पाहणी. दुपारी अडीचला सावंतवाडी येथील आठवडा बाजार जागेची पाहणी. दुपारी पावणे तीनला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येणाऱ्या सावंतवाडी शहराच्या विस्तारीत पाणीपुरवठा योजनेबाबत संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा. दुपारी साडेतीनला नवीन एसटी बसेस लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती (सावंतवाडी), सायंकाळी चार ते सात दरम्यान जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबत अधिकाऱ्यांसमवेत बैठक (सावंतवाडी नगरपालिका सभागृह), सायंकाळी सात ते आठ दरम्यान शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथे राखीव. रात्री आठला सावंतवाडी रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. रात्री ८.२५ ला सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे आगमन. रात्री ८.३६ ला सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथून कोकणकन्या एक्स्प्रेसने मुंबईकडे प्रयाण.
---
तिथवली ग्रामपंचायत विकास निविदा
कणकवली ः वैभववाडी तालुक्यातील तिथवली ग्रामपंचायतच्यावतीने विकास निविदा जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामसचिवालय तिथवली नवीन इमारतीच्या उर्वरित विस्तारी करण्यात येते काम करणे, पंचायत समिती स्तर एक लाख २० हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामपंचायत सचिवालयाच्या आवारातील शौचालय व मुतारी बांधकाम करणे २ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मान्यता प्राप्त ठेकेदारांना किंवा मजूर सहकारी संस्थांना निविदा अर्ज ग्रामपंचायत तिथवलीग्रामपंचायत येथे उपलब्ध करण्यात आले आहेत. मकत्तेदारांना २९ मार्च पर्यंत ही निविदा सादर करावयाची आहे. अटी व शर्ती तसेच अंदाजपत्रक ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध असल्याचे सरपंच ग्रामपंचायत तितवली यांनी कळविले आहे.
---
तिवरे ग्रामपंचायत विकास निविदा
कणकवली ः तालुक्यातील तिवरे ग्रामपंचायतीच्यावतीने विकास निविदा जाहीर करण्यात आली आहे. मान्यताप्राप्त मक्तेदारांकडून मोहरबंद लखोट्यामध्ये निविदा मागविण्यात येत आहे. सुट्टीचे दिवस वगळून ग्रामपंचायत कार्यालयात २९ मार्च पर्यंत बंद लखोट्यात निविदा सादर करावयाची आहे. यामध्ये मुख्य रस्ता चव्हाणवाडीपासून पथदीप बसवणे यासाठी ६७ हजार ९४० रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
--
मुळदेत गुरुवारी रामनवमी उत्सव
कुडाळ ः मुळदे येथील नवनाथ श्रद्धास्थान तपोभूमी येथील नवनाथ उपासक प. पू. बाळकृष्ण घडशी महाराज यांची तपोभूमी येथे गुरुवारी (ता. ३०) रामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी दहाला बाळा माळगावकर (बाव) यांचे कीर्तन, दुपारी साडेबाराला रामजन्म, एकला महाप्रसाद, दोनला एकनाथ ढवळे यांचे वाचन, तीनला निवजेकर मंडळाचे (निवजे) भजन, सायंकाळी पाचला श्रींची पालखी प्रदक्षिणा, सहाला वेताळबांबर्डे कदमवाडी यांचा हरिपाठ, रात्री आठला वासुदेव सडवेलकर (आंदुर्ले) यांचे भजन होणार आहे.
-----------------
पणदूर हायस्कूल इमारतीचे भूमिपूजन
कुडाळ ः वेताळबांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूलला (पणदूर तिठा) इमारत बांधण्यासाठी खासदार कुमार केतकर यांनी दिलेल्या ३५ लाख रुपये खासदार निधीतून इमारतीचे भूमिपूजन व कोनशिला कार्यक्रम संस्था सहसचिव नागेंद्र परब यांच्या हस्ते झाला. संस्था शशिकांत अणावकर, प्रकाश गावडे, जैतापकर, संचालक रिना सावंत, डॉ. अरुण गोडकर, जयभारत पालव, रवींद्र कांदळकर, पाटील, कर्पे, मुख्याध्यापक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षक तसेच कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
----------------
कोळंब वाचनालयाचा १ एप्रिलला वर्धापन
मालवण ः श्री देव खापरेश्वर वाचनालय, कोळंबचा तेरावा वर्धापन दिन १ एप्रिलला ९ वाजता श्रीकृष्ण मंदिर कोळंब या ठिकाणी साजरा होणार आहे. कोळंब गावातील सर्व चार शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, गावातील मंडळे व सर्व ग्रामस्थ सहभागी होऊन कोळंब ग्रामपंचायत ते श्रीकृष्ण मंदिर कोळंबपर्यंत ग्रंथ दिंडीमध्ये महाराष्ट्राची व हिंदुस्थानच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी वेशभूषा परिधान करून जनजागृतीचे कार्य करणार आहेत. लाभ घेण्याचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष सुनील फाटक यांनी केले आहे.
--
कनेडी रस्त्याची दुरवस्था
कणकवली ः कणकवली ते कनेडी रस्त्यावर जागो जागी खड्डे पडले आहे.त्यामुळे रस्त्याची पुन्हा एकदा दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहने चालवने धोकादायक झाले आहे. शहरातून अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यत जाणाऱ्या या रस्त्याची चाळण झाली आहे.
-------------
फोंडाघाट परिसरात उन्हाचा पार तापला
फोंडाघाट ः येथील परिसरात उन्हाचा पार तापला आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होवू लागली आहे. दुपारच्या वेळेत घराभाहेर पडने धोकादायक बनले आहे. पहाटेला थंड वातावरण वगळता दिवसभर कडक उन्हाचा चटका बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतशिवरात काम करणे कठीण झाले आहे.
--
तळाशील किनारी तीन मृत कासवे
मालवण ः मृतावस्थेत बाहून येणार्या समुद्री कासवांची मालिका सुरूच आहे. तळाशील समुद्रकिनारी तीन कासवे मृतावस्थेत आढळली. एलईडी पर्ससीन मासेमारीच्या अतिरेकाचा हा दुष्परिणाम असल्याचे पारंपरिक मच्छीमारांकडून सांगितले जात आहे.