भाविकांची दर्शनासाठी कुडाळेश्वर मंदिरात गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाविकांची दर्शनासाठी
कुडाळेश्वर मंदिरात गर्दी
भाविकांची दर्शनासाठी कुडाळेश्वर मंदिरात गर्दी

भाविकांची दर्शनासाठी कुडाळेश्वर मंदिरात गर्दी

sakal_logo
By

91570
कुडाळ ः श्री देव कुडाळेश्वर महाराजांची ‘जय मल्हार’ रुपात बांधलेली पुजा. (छायाचित्रे ः अजय सावंत)


कुडाळेश्वर मंदिरात
दर्शनासाठी मोठी गर्दी
कुडाळ, ता. २६ ः श्री देव कुडाळेश्वर मंदिर येथील रामनवमी महोत्सवांतर्गत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाले आहे. दर्शन तसेच कार्यक्रमांसाठी भाविकांची गर्दी होत आहे. काल (ता. २५) श्री देव कुडाळेश्वर महाराजांची तिरुपती बालाजी, तर रविवारी जय मल्हार या अवतारात विलोभनीय पूजा साकारण्यात आली.
महोत्सवानिमित्त श्रींच्या पाषाणमूर्तीवर लघुरुद्र अभिषेक, आरती, मंत्रघोष पुराण वाचन, श्रींची पालखी मिरवणूक आदी कार्यक्रम झाले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक, गायक, वादक उपस्थित होते. रात्री कीर्तन श्रवणासाठी श्रीच्या उत्सव मूर्तीचे आगमन झाले. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. त्यानंतर कीर्तन व आरती झाली. काल अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ, म्हापण यांचा विठ्ठल भक्तीवर आधारीत नाट्यप्रयोग ‘कुर्मदासाची वारी’ झाला. तर उद्या (ता. २७) सायंकाळी पाचला सिद्धाई डान्स अॅकॅडमी, कुडाळ संचालिका कविता राऊळ आणि शिष्या तसेच जगन्नाथ संगीत विद्यालयाचे महेश सावंत यांच्या संयुक्त विद्यमाने गायन, वादन व शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम असे कार्यक्रम होणार आहेत. महोत्सवानिमित्त श्री देव कुडाळेश्वर महाराजांची काल शनिवारी ‘तिरुपती बालाजी’, तर आज ‘जय मल्हार’ अवतारात विलोभनीय पूजा महेश राऊळ यांनी साकारली.