
-नाटेतील आगीत आंबा, काजू कलमे खाक
-rat२६p३४.jpg-
९१५७४
नाटे (ता. राजापूर) ः नाटे येथील आगीत आंबा, काजूची बाग जळून खाक झाली.
-
नाटेतील आगीत आंबा, काजू कलमे खाक
पावस, ता. २६ ः राजापूर तालुक्यातील नाटे-ठाकरेवाडी येथील आंबा बागायतदार होलम यांच्या आंबा, काजू बागेला आकस्मिक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शनिवारी (ता. २५) सायंकाळी ही दुर्घटना घडली. या आगीत आंबा, काजू तसेच पाण्याचे पाईप जळून गेले आहेत. विजेच्या शॉर्टसर्कीट होवून ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नाटे-ठाकरेवाडी येथील श्री. होलम यांच्या बागेमध्ये महावितरणच्या दोन वायर एकत्र चिकटल्याने झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. या आगीत होलम यांची अर्धी बाग जळून खाक झाली. हापूस कलमे, काजू कलमांचा त्यामध्ये समावे आहे. तसेच आजुबाजूच्या बागांनाही आगीची झळ बसली आहे. आग लागल्याचे होलम यांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी मोठ्या शर्थीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे अन्य शेतकऱ्यांच्या बागा वाचल्या.