राजापूर-राजापुरात मोटारीची टॅंकरसह मोटारीला धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-राजापुरात मोटारीची टॅंकरसह मोटारीला धडक
राजापूर-राजापुरात मोटारीची टॅंकरसह मोटारीला धडक

राजापूर-राजापुरात मोटारीची टॅंकरसह मोटारीला धडक

sakal_logo
By

rat२६४९.txt

फोटो ओळी
-rat२६P३६.jpg -

91585
राजापूर : तिहेरी अपघातातील टॅंकर आणि दोन मोटारी.
-----------

राजापुरात मोटारीची
टॅंकरसह मोटारीला धडक

महिला जखमी; गाड्यांचे नुकसान

राजापूर, ता. २६ : मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली पेट्रोलपंपाजवळ मुंबईहून गोव्याकडे भरधाव जाणाऱ्या मोटारीने समोरून येणाऱ्या डांबर वाहतूक करणाऱ्या टँकर आणि मोटारीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये महिला जखमी झाली असून, सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला.
याप्रकरणी टँकरचालक बाबासाहेब साहेबराव मोरे (रा. विक्रोळी, मुंबई) यांनी राजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब मोरे हा टँकर (एमएच-४६-बीयु-५१३९) घेऊन गोव्याकडून मुंबईकडे जात होता. कोदवली पेट्रोलपंपाजवळ पुलावरून एकेरी मार्गाने जात असताना अचानक समोरून निळ्या रंगाची मोटार (जीए-०७-ई- ४८२९) वेगाने तिच्यापुढे असलेल्या मोटारीला (एमएच-०४-इएन-४७४८) बाजू काढून पुढे येत असताना टँकरवर धडकली. त्यानंतर निळी मोटार उलट फिरून तिच्या पाठीमागून येणाऱ्या मोटारीवर धडकली.
निळी मोटार रोहिदास रामा चोडणकर हे चालवित होते. या अपघातात मोटारचालकांची पत्नी वैशाली यांना दुखापत झाली. त्यांच्यावर राजापूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना ओरोस (जि. सिंधुदुर्ग) येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली. अपघातात टँकरचा हेडलाईट फुटला असून, उजव्या बाजूचा बंपर वाकला आहे. दोन्ही मोटारींचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
...............