औषधे संपेपर्यंत काय करत होता? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औषधे संपेपर्यंत काय करत होता?
औषधे संपेपर्यंत काय करत होता?

औषधे संपेपर्यंत काय करत होता?

sakal_logo
By

91595
सावंतवाडी ः येथे पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री रविंद्र चव्हाण. शेजारी माजी नगराध्यक्ष संजू परब, राजन वराडकर, बंटी पुरोहित व अन्य. (छायाचित्र ः रुपेश हिराप)


औषधे संपेपर्यंत काय करत होता?

पालकमंत्र्यांचा डॉक्टरांना प्रश्न; जिल्हा प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः रुग्णालयातील औषधे संपेपर्यंत डॉक्टर काय करत होते? असा सवाल उपस्थित करत एखाद्या रुग्णाचा जीव जाण्याची वाट बघत होते का? रुग्णालयात औषध नाही, ही जबाबदारी जिल्हा आरोग्य प्रशासनाची व स्थानिक अधिकाऱ्यांची नाही का? त्यांनी वेळेत दखल घेतली असती, पाठपुरावा केला असता तर हा प्रश्न निर्माण झाला नसता, अशा कानपिचक्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी देत जिल्हा प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.
ज्या रुग्णालयात औषध तुटवडा जाणवत आहे, तेथील संबंधित प्रमुखाला याची जाणीव असणे गरजेचे आहे. त्याचवेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळविल्यास तात्काळ औषधाची सोय होऊ शकते. मात्र, त्यासाठी डॉक्टरांची मानसिकता असणे गरजेचे आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून श्री. चव्हाण यांनी ''मन की बात'' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तत्पूर्वी पत्रकारांनी त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी तालुकाध्यक्ष संदीप गावडे, राजन वराडकर, बंटी पुरोहित आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सावंतवाडी कुटीर रुग्णालयात गेले काही दिवस औषध पुरवठा झाला नव्हता. त्यामुळे त्या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना बाहेरून औषधे लिहून दिली जात होती. यात ताप, टीटीसारख्या औषधांचा समावेश होता. काल ही औषधे उपलब्ध करून देण्यात आली. परंतु, गेली अनेक वर्षे हा प्रश्न वारंवार भेडसावत आहे. त्यामुळे पालकमंत्री चव्हाण यांचे याकडे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका मांडली.
---
प्रमुखाला जाणीव असणे गरजेचे
पालकमंत्री म्हणाले, ‘‘ज्या रुग्णालयात औषध तुटवडा जाणवत आहे. त्यावेळी संबंधित प्रमुखाला याची जाणीव असणे गरजेचे आहे. त्याच वेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळविल्यास तात्काळ औषधाची सोय होऊ शकते. ते निवेदन थेट राष्ट्रपतीपर्यंत पाठवता येऊ शकते, अशा अत्यावश्यक गोष्टीवर तात्काळ निर्णय होतो; मात्र, त्या ठिकाणी काम करणाऱ्या संबंधित व्यक्तीला सकारात्मक भूमिका घेऊन त्यासाठी आवश्यक असलेला पाठपुरावा करावा लागतो. त्यासाठी संबंधितांची मानसिकता असणे गरजेचे आहे.’’
--
मागणी केली असती तर प्रश्नच नव्हता
‘‘ज्यावेळी औषध साठा संपला, त्यावेळी संबंधितांना त्याची कल्पना आली असावी. त्यावेळेस त्यांनी मागणी केली असती तर हा प्रश्नच निर्माण झाला नसता. सीआरएस फंडात मोठ्या प्रमाणात रक्कम आहे. ती खर्च केल्यास औषध पुरवठा कमी पडूच शकत नाही. मात्र, त्यासाठी डॉक्टरांची मानसिकता असणे गरजेचे आहे, असे पालकमंत्री म्हणाले.’’