
साखर, रक्तदाब तपासणी आता काही क्षणात
साखर, रक्तदाब तपासणी आता काही क्षणात
इन्फिगो आय केअर ; आज, उद्या मोफत सुविधा
रत्नागिरी, ता. २६ : मधुमेहाचा परिणाम किडनी, डोळ्यांवर लगेच होतो. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी रक्तातील साखर तपासणी वेळेवर करून तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. परंतु प्रत्येक वेळा तपासणी करण्यावर बंधने येतात. परंतु आता रक्तातील साखर, रक्तदाब आणि अन्य अनेक प्रकारच्या तपासण्या काही क्षणात अत्याधुनिक उपकरणे, सीजीएम तंत्रज्ञानाद्वारे शक्य आहेत. या साधनांद्वारे इन्फिगो आय केअर हॉस्पीटलमध्ये सोमवारी (ता. २७) आणि मंगळवारी (ता. २८) मोफत तपासणी करण्यात येणार आहे. इन्फिगो हॉस्पिटलमध्ये डोळ्यांच्या पडद्याची तपासणी करायला आलेल्या रुग्णांना याचा फायदा होणार आहे.
बायोहॅकींग हे नवीन तंत्रज्ञान आरोग्य सेवेत येऊ घातले आहे. केवळ फोटो काढून शरीरातील विविध पातळ्या जाणून घेणे शक्य झाले आहे. मोबाईल कॅमेऱ्यातून फोटो काढून हृदयाचे ठोके, ऑक्सिजन पातळी, ताणतणाव पातळी, कार्डियाक रिदम याची क्षणात माहिती मिळते. या तंत्रज्ञानामुळे नगण्य खर्चात शरीराच्या विविध चाचण्या करता येणे शक्य आहेत, अशी माहिती तंत्रज्ञ ओंकार दीक्षित यांनी दिली.
ते म्हणाले, ऍक्टोफीटने हे तंत्रज्ञान आणले आहे. मधुमेहासाठी देखील उपयुक्त असे सीजीएम उपकरण तयार करण्यात आले आहे. ते दंडावर बांधले असता दर १५ मिनिटांनी रक्तातील साखरेची पातळी नोंदविली जाते. जेवणानंतर किंवा व्यायाम केल्यावर या साखरेच्या पातळीत काय फरक पडतो, हेसुद्धा पाहणे शक्य आहे. काही क्षणात विविध चाचण्यांचे अहवाल मिळवता येणार आहे. सोमवार व मंगळवारी ही मोफत सुविधा डोळे तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांकरिता इन्फिगोने उपलब्ध करून दिली आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन इन्फिगो आय केअरने केले आहे.