बाजार समितीसाठी २८ एप्रिलला मतदान

बाजार समितीसाठी २८ एप्रिलला मतदान

बाजार समितीसाठी
२८ एप्रिलला मतदान
अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २६ ः जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. उद्यापासून (ता.२७) अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. ता. २८ एप्रिलला मतदान तर दुसऱ्या दिवशी मतमोजणी आहे. प्रथमच राज्याने कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीला ग्रामपंचायत सदस्यांना अधिकार दिला आहे. त्यामुळे या वर्षी निवडणूक चुरशीची होणार आहे.
जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने निवडणूक कार्यक्रम जाहीर कला. जिल्ह्यातील विकास संस्था संचालकांबरोबरच ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. समितीच्या निवडणुकीसाठी ६ हजार ८२६ एवढे मतदार निश्चित झाले आहेत. यात विकास संस्था मतदार दोन हजार ७३१ असून ग्रामपंचायत सदस्य मतदार चार हजार ७० एवढे आहेत. थेट मतदार म्हणून व्यापारी परवानाधारक असलेल्या २५ सभासदांचा समावेश आहे. निवडणूक जिल्ह्यातील राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. दरम्यान, बाजार समितीसाठी
उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. ३ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. ५ एप्रिलला छाननी होणार आहे. २८ एप्रिलला गरज पडल्यास मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. २९ एप्रिलला मतमोजणी होणार आहे.

१८ संचालक पदांसाठी निवडणूक
जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी एकूण १८ संचालक निवडून द्यायचे आहेत. यात विकास संस्था संचलकांमधून ११ संचालक निवडले जाणार आहेत. त्यात दोन जागा महिलांसाठी राखीव असून इतर मागास वर्ग आणि विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून एक संचालक निवडला जाणार आहे. ग्रामपंचायत सदस्य मतदारांतून एकूण चार संचालक येतील. त्यात एक जागा अनुसूचित जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्ग आणि एक जागा आर्थिक दुष्ट्या दुर्बल असलेल्या मतदारांसाठी राखीव आहे. व्यापारी आडके मतदारसंघातून दोन संचालक निवडले जाणार आहेत. हमाल व तोलारी मतदारांतून एक संचालक निवडला जाणार आहे. मात्र, हमाल व तोलारी सभासद मतदार या संस्थेकडे नसल्याने ही जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

शिक्षक पतपेढीची आज अंतिम यादी
जिल्ह्यातील प्राथमिक शाळांतील गुरुजींचे राजकारण आता तापणार आहे. प्राथमिक शिक्षकांची सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गनगरी या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक घेण्याची पूर्वतयारी जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक विभागाने सुरू केली आहे. त्याची प्रारूप मतदार यादी दोन फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात आली होती. २ हजार ९८२ एवढे मतदार प्रारूप यादीत निश्चित झाले असून उद्या (ता.२७) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com