उध्दव ठाकरे शिवसेनेचा माणगावात बॅनर फाडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उध्दव ठाकरे शिवसेनेचा 
माणगावात बॅनर फाडला
उध्दव ठाकरे शिवसेनेचा माणगावात बॅनर फाडला

उध्दव ठाकरे शिवसेनेचा माणगावात बॅनर फाडला

sakal_logo
By

उद्धव ठाकरे शिवसेनेचा
फलक फाडल्याने तणाव

माणगावातील प्रकार; सीसीटीव्ही फुटेज ताब्यात

कुडाळ, ता. २६ ः माणगाव तिठा येथील चौकात आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेला फलक अज्ञाताने फाडल्याने उद्धव ठाकरे शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत लगत असलेल्या बेकरीवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेतले.
तालुक्यातील माणगाव तिठा येथे आमदार नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या वतीने शुभेच्छा बॅनर लावण्यात आला होता. काल मध्यरात्री (ता. २५) दोनच्या सुमारास हा फलक लावला होता; मात्र काही वेळातच तो फाडण्यात आला. याबाबत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना माहिती मिळताच त्यांनी संताप व्यक्त केला. याबाबतची माहिती माणगाव दूरक्षेत्राचे पोलिस भोई यांना दिली. भोई यांनी कुडाळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर आज दुपारी बाराच्या सुमारास कुडाळ पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे, माणगाव पोलिस दूरक्षेत्राचे हेडकॉन्स्टेबल भोई, पालव यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. नजीकच्या बेकरीमध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून ते ताब्यात घेतले. यावेळी ठाकरे गट युवा सेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, सरपंच मनीषा भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, विभागप्रमुख बंड्या कुडतरकर, कौशल्य जोशी, अवधूत गायचोर, साई नार्वेकर आदी उपस्थित होते.