सर्वसामान्य जनतेशी नाळ कायम

सर्वसामान्य जनतेशी नाळ कायम

91623
आचरा ः येथे सत्कार सोहळ्यात बोलताना आमदार वैभव नाईक.

सर्वसामान्य जनतेशी नाळ कायम

आमदार वैभव नाईक; आचऱ्यात ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार

आचरा, ता. २६ ः सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ कदापी तुटू देणार नाही, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी येथे केले. आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे शिवसेना आचरा विभाग व युवा सामाजिक कार्यकर्ते गणेश तोंडवळकर यांच्यावतीने आचरा जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ६५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आमदार नाईक बोलत होते.
तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, विनायक परब, शिल्पा खोत, गणेश तोंडवळकर, शाम घाडी, दिलीप कावले, उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, वायंगणी सरपंच रुपेश पारकर, संजय केळूसकर, प्रकाश वराडकर, अनुष्का गावकर, राजू नार्वेकर, समीर लब्दे, माया सावंत, केदार परुळेकर, अविराज परब, अनिल परब, नितीन घाडी आदी उपस्थित होते.
आमदार नाईक म्हणाले, ‘‘आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता सलग दोन वेळा आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आला आहे. बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि तुमच्यासारख्या सर्वसामान्यांमुळे हे शक्य झाले असून याची मला पूर्ण जाणीव आहे. गावात विकासकामे होण्यासाठी आमच्यावर विश्वास ठेवून जनतेने परिवर्तन घडविले आणि त्या परिवर्तनाची जबाबदारी म्हणून या मतदार संघात विकास निधी आणून प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न मी केला आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर काही नेते सोडून गेले, तरी उद्धव ठाकरे यांनी आपल्याबरोबर किती लोक आहेत याचा विचार करत न बसता आपला लढा सुरू ठेवला आहे. आज आपल्या प्रेमामुळे लाखोंच्या संख्येने लोक कोणतीही अपेक्षा न ठेवता उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच विजयी होऊ. येणाऱ्या काळामध्ये निश्चितच विकासकामांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com