नीलेश राणेंनी पाहिला ‘मन की बात’

नीलेश राणेंनी पाहिला ‘मन की बात’

91626
मालवण ः ‘मन की बात’ कार्यक्रम पाहण्यासाठी माजी खासदार नीलेश राणे येथील भाजप कार्यालयात उपस्थित होते.

नीलेश राणेंनी पाहिला ‘मन की बात’
मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला उद्देशून गेली काही वर्षे ‘मन की बात’ हा कार्यक्रम सातत्याने करत आहेत. मालवण दौऱ्यावर असलेले भाजप प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांनी येथील भाजप कार्यालयात उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सोबत हा कार्यक्रम पाहिला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, खरेदी-विक्री संघ अध्यक्ष राजन गावकर, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, आप्पा लुडबे, आबा हडकर, महेश सारंग, बबलू राऊत, ललित चव्हाण, राजू बिडये, दीपक सुर्वे, विक्रांत नाईक, भाई मांजरेकर आदी उपस्थित होते.
.................
91627
मालवण ः आरोग्य शिबिराचे मान्यवरांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले.

मालवणमध्ये २१५ जणांची आरोग्य चिकित्सा
मालवण : सकल भंडारी हितवर्धक संस्थेच्या वतीने सीमा भगवान ऊर्फ नाना करंजे, राजश्री नारायण आचरेकर, दीपक बळवंत मयेकर यांच्या स्मरणार्थ सर्व धर्मियांसाठी आज भंडारी हायस्कूल येथे आयोजित मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. २१५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिवाय मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रवी तळाशीलकर, पंकज पेडणेकर, भाऊ साळगावकर, बाळू मुणगेकर, सुनील नाईक, बाबू परुळेकर, अजित गवंडे, जयंत चिंदरकर, सचिन गवंडे, निखिल वस्त, नीलेश तळाशीलकर, मिलिंद झाड, रत्नाकर कोळंबकर, प्रदीप वेंगुर्लेकर, बाळा सोन्सूरकर, शेखर वाईरकर, संतोष नागवेकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com