Fri, June 9, 2023

होरपळलेल्या आंबा बागांची
आमदार राणेंकडून पाहणी
होरपळलेल्या आंबा बागांची आमदार राणेंकडून पाहणी
Published on : 26 March 2023, 3:31 am
91642
वाडा : भागातील जळालेल्या कलम बागांची आमदार नीतेश राणे यांनी पाहणी केली.
होरपळलेल्या आंबा बागांची
आमदार राणेंकडून पाहणी
देवगड, ता. २६ : वाडा, पालये परिसरातील कलम बागांना लागलेल्या आगीची आमदार नीतेश राणे यांनी पाहणी केली. संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तालुक्यातील वाडा, फणसे, पडवणे, पालये या भागातील विविध बागायतदारांच्या हापूसच्या बागा आगीमध्ये होरपळल्या. यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. आमदार राणे यांनी याबाबत सरकारकडे भूमिका मांडून नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करू, असा विश्वास दिला. भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे उपस्थित होते.