सावंतवाडीत गुरुवारी रामनवमी उत्सव

सावंतवाडीत गुरुवारी रामनवमी उत्सव

swt२७२.jpg
L91683
सावंतवाडीः पत्रकार परिषदेत बोलताना अजित फाटक. बाजूला चिन्मय रानडे, प्रकाश रेडकर आदी.

सावंतवाडीत गुरुवारी रामनवमी उत्सव
‘विहिंप’चा पुढाकारः शोभायात्रेसह विविध कार्यक्रमांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ः येथील विश्व हिंदू परिषदेच्यावतीने गुरुवारी (ता. ३०) सावंतवाडी येथे श्रीरामनवमी उत्सवाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम येथील श्री देव नारायण मंदिरात होणार असून सकाळी १२ वाजता रामजन्मोत्सव, सायंकाळी ४ ते ६ या वेळेत शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. रात्री गीत रामायणाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष अजित फाटक यांनी दिली. सकल हिंदू बांधवांना आणि संस्थांना एकत्र आणण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न असून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत श्री. फाटक बोलत होते.
यावेळी संपर्कप्रमुख चिन्मय रानडे, ‘इस्कॉन’चे प्रकाश रेडकर, बजरंग संयोजक गौरव शंकरदास, कोषाध्यक्ष विनायक रांगणेकर, लक्ष्मीकांत कराड, किशोर चिटणीस आदी उपस्थित होते.
श्री. फाटक पुढे म्हणाले, ‘‘सकाळी प्रथेप्रमाणे १२ वाजता रामजन्मोत्सव श्री देव नारायण मंदिर येथे नियोजित केला आहे. दुपारी ४ वाजता सावंतवाडी शहर व परिसरातील हिंदू बांधव व हिंदू संस्थांची शोभायात्रा आयोजित केली आहे. शोभायात्रेचा मार्ग श्री देव नारायण मंदिर येथून निघून मुख्य रस्त्याने नगरपालिका, रामेश्वर प्लाझा, मिलाग्रीस चर्च कोपरा, जयप्रकाश चौक, गांधी चौक, उभा बाजार, चितारआळी या मार्गाने परत नारायण मंदिर असा असेल. शोभायात्रेमध्ये ढोलपथक, वारकरी मंडळी, शाळेतील मुलांचे लेझीम पथक, विविध हिंदू संस्थांची पथके, चित्ररथ तसेच रामायणातील विविध पात्रे सजीव स्वरुपात असे घटक समाविष्ट होणार आहेत. रामाची पालखी व रथ, मुलांचे कार्यक्रम अशा आकर्षक पद्धतीने शोभायात्रा निघणार आहे. मार्गावर विविध ठिकाणी भाविकांना दर्शन, पूजा यांचीही सोय केली आहे. श्री देव नारायण मंदिर परिसरात रंगमंचावर शोभायात्रेचा समारोप झाल्यानंतर गीतरामायण व ‘भक्ती-प्राबल्य’ हे श्रीरामांवर आधारीत दशावतारी नाटक अशा विविध कार्यक्रमांनी ही रामनवमी करण्याचा करण्याचा तमाम हिंदू समाजाचा मानस आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com