पावस ःगाळ उपशाचे लोकप्रतिनिधींचे आश्वासन हवेत

पावस ःगाळ उपशाचे लोकप्रतिनिधींचे आश्वासन हवेत

rat२७१८.txt

बातमी क्र..१८ (टुडे पान ३ साठी)

फोटो ओळी
-rat२७p५.jpg ः

91665
पावस ः गाळाने भरलेली गौतमी नदी.
------------------
लोकप्रतिनिधींचे आश्वासन हवेत

पावसची गौतमी नदी निधीअभावी गाळातच; चार वर्षांपूर्वीचा गाळ पुन्हा पात्रात

पावस, ता. २७ ः पावसची भाग्यरेषा समजल्या जाणाऱ्या गौतमी नदीपात्रातील गाळ उपसण्याकरिता निधी देण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधींनी दिले तरीही निधी उपलब्ध झालेला नाही. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कामाला गती मिळणार नसल्याने परिसरात नाराजीचा सूर उमटत आहे.
तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी चार वर्षांपूर्वी गौतमी नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. त्या माध्यमातून नवलादेवी मंदिर ते बळगे स्मशानभूमीदरम्यान नदीतील गाळ उपसला; परंतु हा गाळ नदीच्या दोन्ही बाजूला टाकल्यामुळे नदीच्या पात्राची रूंदी व उंची चांगल्याप्रकारे झाल्यामुळे पावसाळ्यातील पाण्याचा प्रवाह पात्राच्या बाहेर जाण्याचे प्रमाण कमी झाले. दुसऱ्या वर्षी आणखीन गाळ काढणे गरजेचे होते; परंतु तसे न केल्याने गाळ पुन्हा नदीपात्रात आला आहे. याकरिता निधी उपलब्ध करण्यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर लोकप्रतिनिधींकडून गाळ उपसण्याकरिता निधी देण्याचे आश्वासन ऑक्टोबर महिन्यात एका कार्यक्रमावेळी दिले; परंतु पावसाळा जवळ आला तरी हे आश्वासन लोकप्रतिनिधींनी पूर्ण केलेले नाही. राजापूर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी आदी ठिकाणी शासनातर्फे व लोकसभागातून निधी उपलब्ध झालेला असताना पावस येथील गौतमी नदीकडे दुर्लक्ष का? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गाळ उपशाकडे वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात गौतमी नदी गाळात अडकण्याची शक्यता आहे.
------
चौकट
मंत्र्यांची घेणार भेट
यासंदर्भात गौतमी नदी गाळमुक्त करण्याच्या प्रयत्नाला यश प्राप्त करून घेण्यासंदर्भात प्रयत्नशील असलेले माधव कानडे म्हणाले, ‘मी लवकरच यासंदर्भात संबंधित मृदसंधारण खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भातील निधीबाबत विचारणा करणार आहे, जेणेकरून काहीतरी तांत्रिक अडचणी असल्यास त्या सोडवण्याच्यादृष्टीने प्रयत्नशील राहणार आहे. मंत्र्यांनी दिलेले आश्वासन कधी पूर्ण करणार, याचीही विचारणा करणार आहे.
......................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com