लांजा ः जिल्हा परिषद गटात भाजप मजबूत करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा ः जिल्हा परिषद गटात भाजप मजबूत करा
लांजा ः जिल्हा परिषद गटात भाजप मजबूत करा

लांजा ः जिल्हा परिषद गटात भाजप मजबूत करा

sakal_logo
By

rat२७२१.txt

बातमी क्र. २१ (टुडे पान ३ साठी)

फोटो ओळी
- rat२७p९.jpg ः

91672
लांजा ः नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना भाजप नेत्या उल्का विश्वासराव.
-----------
जिल्हा परिषद गटात भाजप मजबूत करा

उल्का विश्वासराव ः गट उपाध्यक्ष, युवा अध्यक्ष जाहीर

लांजा, ता. २७ ः ‘पक्षाच्या माध्यमातून लांजा तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. आगामी काळात विकासकामांसाठी निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद गट आणि पूर्व विभागात पक्ष संघटना अधिक मजबूत करा,’ असे आवाहन भाजपच्या नेत्या उल्का विश्वासराव यांनी भांबेड येथे केले.
भांबेड जिल्हा परिषद गटातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक येथील भाजप संपर्क कार्यालयात झाली. यावेळी विश्वासराव बोलत होत्या. यावेळी तालुकाध्यक्ष महेश खामकर, जिल्हा सरचिटणीस यशवंत वाकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल रेडीज उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना विश्वासराव म्हणाल्या, ‘पक्षाच्या माध्यमातून आताच विविध विकासकामांसाठी साडेतेरा कोटी रुपयांचा निधी पूर्व विभागातील कामांसाठी मिळाला आहे. यापुढेही पक्षाच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. मात्र, त्यासाठी पक्षाची ध्येयधोरणे व पक्षाच्या लोकाभिमुख असलेल्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा आणि पक्ष संघटना मजबूत करा.’
बैठकीत बूथ अभियान सशक्तीकरण राबवणे, या विषयावरदेखील चर्चा झाली. भांबेड जिल्हा परिषद गट उपाध्यक्षपदी कमलाकर शिवगण आणि भांबेड जिल्हा परिषद युवा अध्यक्ष म्हणून सचिन शिवगण यांची निवड केल्याचे जाहीर करण्यात आले. या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे विश्वासराव तसेच खामकर यांच्या हस्ते पक्षाची शाल घालून अभिनंदन केले.
..............
चौकट
लांजा तालुका शतप्रतिशत भाजपमय
आगामी काळात आपल्याला संपूर्ण तालुका शतप्रतिशत भाजपमय झाला पाहिजे, यादृष्टीने काम करणे अपेक्षित आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून आपल्याला विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत आहे आणि होणार आहे. मात्र, त्यासाठी सर्व भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकजुटीने, एकदिलाने काम करून पक्ष संघटना मजबूत करूया, असे आवाहन तालुकाध्यक्ष महेश खामकर यांनी केले.
..............