सामूहिक रामरक्षा पठण

सामूहिक रामरक्षा पठण

-rat२७p१६.jpg-
९१६९५
रत्नागिरी : ओम साई मित्रमंडळ आयोजित सामूहिक रामरक्षा पठण कार्यक्रमात सहभागी मुले, महिला भाविक.
-
सामूहिक रामरक्षा पठण

नाचणे येथे ओम साई मित्रमंडळातर्फे आयोजन ; भावपूर्ण वातावरण

रत्नागिरी, ता. २७ : श्रीरामनवमीनिमित्त नाचणे- साळवी स्टॉप येथील ओम साई मित्र मंडळातर्फे रविवारी (ता. २६) आयोजित सामूहिक श्री रामरक्षा पठण आणि रामनाम जप उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मंडळाच्या सभागृहात हा कार्यक्रम प्रथमच आयोजित केला होता. श्रीरामरक्षा पठण आणि श्रीरामनाम जप भावपूर्ण वातावरणात झाला.
प्रास्ताविकामध्ये दीप्ती आगाशे यांनी रामरक्षा स्तोत्र पठणाचे महत्त्व विशद केले. त्या म्हणाल्या की, स्तोत्र म्हणजे देवतेचे स्तवन, म्हणजेच देवतेची स्तुती. स्तोत्रपठण केल्याने पठण करणार्‍या व्यक्‍तीभोवती सूक्ष्म स्तरावरील संरक्षककवच निर्माण होऊन तिचे अनिष्ट शक्‍तींपासून रक्षण होते. ज्या वेळी ठराविक लयीत अन् सुरात एखादे स्तोत्र म्हटले जाते, त्या वेळी त्या स्तोत्रातून एक विशिष्ट चैतन्यदायी शक्‍ती निर्माण होते. याकरिता स्तोत्र एका विशिष्ट लयीत म्हणणे आवश्यक आहे. तसेच या स्तोत्रातील श्रीरामाच्या गुणांच्या वर्णनामुळे ते गुण आपल्यात येतात. रामरक्षा स्तोत्राच्या नित्य पठणाने संकटापासून कसे रक्षण होते याची अनुभूतीही त्यांनी कथन केली.
वेदमूर्ती अवधूत मुळ्ये यांच्यासह सर्व भाविकांनी श्रीरामरक्षा स्तोत्राचे सामूहिक पठण केले. त्यानंतर ''श्रीराम जय राम जय जय राम'' या नामजपाचेही सामूहिक पठण करण्यात आले. सामूहिक पठणामुळे सभागृहातील वातावरण सात्विक, भक्तीमय झाल्याचा अनुभव अनेकांना आला. या उपक्रमात लहान मुलांसह महिला, ज्येष्ठांनीही सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सांगता हिंदुराष्ट्र स्थापनेच्या प्रतिज्ञेने झाली. कार्यक्रमामध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत आगाशे, अभिषेक मगदूम, शार्दूल मोरे, आर्यन सावंत, सुहास ठाकुरदेसाई, जया सामंत, किरण देवल- अमरावत, ऋता पंडित, शिल्पा सुर्वे, प्रिया लोवलेकर यांसह १०० हून भाविक सहभागी झाले. ओम साई मित्र मंडळाचे गौरांग आगाशे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com