रिक्षा थांब्याचे उद्घघाटन

रिक्षा थांब्याचे उद्घघाटन

-rat27p19.jpg-
91753
रत्नागिरी ः टीआरपी येथे नवलाई रिक्षास्टॉपचे उद्घाटन करताना सरपंच ऋषिकेश भोंगले. सोबत प्रकाश रसाळ व रिक्षाचालक.
------------
नवलाई रिक्षा थांब्याचे उद्घाटन

रत्नागिरी ः टीआरपी येथे नवलाई रिक्षास्टॉपचे उद्घाटन नाचणे ग्रामपंचायतीचे सरपंच ऋषिकेश (भैय्या) भोंगले व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश रसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला उद्योजक दीपक माईन व मनोज सावंत, नवलाई रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष अभिजित सागवेकर, उपाध्यक्ष सुमित नागवेकर, खजिनदार अवधूत आमकर, आरटीओ सदस्य मिथुन शिवगण, शेअर रिक्षा संघटना अध्यक्ष अमर पाटील, सचिव इमरान नेवरेकर, रिक्षा संघटना व चालक-मालक सदस्य किरण धामापूरकर, शाम देवरूखकर, तेजस पावसकर, आनंद डाकवे, गौरव खेडेकर, दिनेश राहटे, अनंत रहाटे, प्रशांत चव्हाण, भूषण चाळके, सतीश शिंदे, संजय गराटे, विनोद हटकर, अजय पांचाल, वसीम खान, राकेश साळवी, तुकाराम सासुलकर, स्वरूप राऊत, लक्ष्मीकांत महाले, बाबू कदम, रोहीत कांबळे व सर्व रिक्षाचालक मालक उपस्थित होते.
-

फोटो ओळी
-rat27p.jpg-
91731
कटक ः राष्ट्रीय सबज्युनिअर तायक्वॉंदो स्पर्धेत कास्यपदक पटकावणारी सुरभी पाटील. सोबत प्रशिक्षक.
-
तायक्वॉंदो स्पर्धेत सुरभी पाटीलचे यश

रत्नागिरी ः कटक (ओडिशा) येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सबज्युनियर क्युरोगी आणि पुमसे तायक्वॉंदो स्पर्धेत महाराष्ट्राने पहिल्याच दिवशी चमकदार कामगिरी केली. रत्नागिरीतील सुरभी पाटील हिनेसुद्धा कास्यपदक जिंकले. तायक्वॉंदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने कटकच्या जे. एन. इनडोअर स्टेडियममध्ये राष्ट्रीय सबज्युनिअर तायक्वॉंदो स्पर्धा सुरू आहे. खेळाडूंना संघ व्यवस्थापक अजित घारगे, प्रशिक्षक प्रशांत कांबळे व दिनेशसिंग राजपूत, पुमसे प्रशिक्षक रॉबिन मेनेझेस यांचे मार्गदर्शन लाभले. सुरभीचे विशेष अभिनंदन रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, शशांक घडशी, सचिव लक्ष्मण कररा, गणराज तायक्वांदो क्लबचे अध्यक्ष प्रशांत मकवाना, सुरभीच्या प्रशिक्षक आराध्या मकवाना, अभिजित विलणकर, रंजना मोडूळा, नेहा कीर, साक्षी मयेकर, पूजा कवितके आदींनी अभिनंदन केले.
-
फोटो ओळी
-rat27p24.jpg
91735
ः साखरपा ः सरपंच प्रियंका जोयशी आणि रूचिता जाधव यांचा सन्मान करताना गीतांजली सावंत.
--
सावंत महाविद्यालयात पारितोषिक वितरण

साखरपा ः येथील प्रा. आबासाहेब सावंत कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्षातील बक्षीस वितरण समारंभ झाला. कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक बी. एस. हिर्डेकर, देवरूख महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुरेश जोशी आणि प्राचार्य एल. डी. माळी उपस्थित होते. वर्षभरातील विविध स्पर्धा, परीक्षा यांची पारितोषिके देण्यात आली. प्रा. आबाजी सावंत यांनी ग्रामीण भागात महाविद्यालय सुरू करण्याचा हेतू सफल झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाला माजी सरपंच बापू शेट्ये, विद्यमान सरपंच रूचिता जाधव आणि प्रियंका जोयशी उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com