कणकवलीत ७ एप्रिलपासून 
दशावतारी नाट्य महोत्‍सव

कणकवलीत ७ एप्रिलपासून दशावतारी नाट्य महोत्‍सव

कणकवलीत ७ एप्रिलपासून
दशावतारी नाट्य महोत्‍सव

मंत्री राणेंच्या वाढदिनाचे निमित्त

कणकवली, ता.२७ : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ७ ते १० एप्रिल या दरम्‍यान दशावतारी नाट्य महोत्‍सवाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त संदेश सावंत आणि समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नाट्यमहोत्‍सवात ७ एप्रिल रोजी सायंकाळी सहाला ‘आम्ही लाल परी’ निर्मित, विलास खानोलकर लिखित, गणपत घाणेकर आणि सहाय्यक दिग्दर्शक सुहास वरुणकर दिग्दर्शित ‘दशावतार गोविंद हरिश्चंद्राचो’ हे नाटक होईल. ८ एप्रिल रोजी सायंकाळी सहाला चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळाचे ‘रक्तजल डोहाळे’, तर रात्री नऊला कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचे ‘अर्धशिरा’ हे नाटक होईल. ९ एप्रिल रोजी सायंकाळी सहाला जय हनुमान दशावतार नाट्यमंडळाचे ‘वरुण देव गर्वहरण’ आणि रात्री नऊला चेंदवणकर गोरे दशावतार नाट्यमंडळाचे ‘कृष्ण पूजन’ हे नाटक होईल. १० एप्रिल रोजी सायंकाळी सहाला वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचे ‘बालभूवनेश्वर’ आणि रात्री नऊला अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळाचे ‘कुर्मादासाची वारी’ हा नाट्यप्रयोग होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com